प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 04:03 PM2024-10-23T16:03:15+5:302024-10-23T16:05:07+5:30

Prabhas : 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास आज २३ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करतो आहे. अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास भेटवस्तू दिली आहे.

Prabhas gifted his fans on his birthday, the powerful poster release of 'Raja Saab' | प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज

प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास (Prabhas) आज २३ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करतो आहे. अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास भेटवस्तू दिली आहे. आता त्याने त्याचा आगामी सिनेमा 'द राजा साब'(The Raja Saab Movie)चा दमदार पोस्टर रिलीज केले आहे. यासोबत या चित्रपटाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे.

अभिनेता प्रभासने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत लिहिले की, साहसाची वेळ आली आहे. १० एप्रिल, २०२५ला सिनेमागृहात भेटूयात. या पोस्टरमध्ये प्रभासचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे. यात अभिनेता सिंहासनावर रॉयल अंदाजात पाहायला मिळत आहे. यात तो आक्रमक दिसतो आहे.


दिग्दर्शक मारुती दिग्दर्शित प्रभासच्या या चित्रपटात निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सध्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम जोरात सुरू आहे. 'द राजा साब' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. सध्या या पोस्टरवर युजर्सच्या खूप मनोरंजक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवण्यासाठी येत आहे राजा'. आणखी एका यूजरने लिहिले, 'राजा साब'. तर एका युजरने लिहिले की, 'द्वेष करणाऱ्यांना किती योग्य उत्तर मिळाले, प्रभासने वर्चस्व गाजवले'.

पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली 'द राजा साब'ची निर्मिती होत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील संगीत थमन यांनी दिले आहे.
 

Web Title: Prabhas gifted his fans on his birthday, the powerful poster release of 'Raja Saab'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास