Adipurush : 'आदिपुरुष'चा दुसरा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज, VFXचा जबरदस्त अनुभव देणाऱ्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 09:39 AM2023-06-07T09:39:51+5:302023-06-07T09:40:15+5:30

फिल्मी रसिकांना १६ जूनची प्रतिक्षा आहे. त्याआधी 'आदिपुरुष'चा हा दुसरा ट्रेलर पाहाच

prabhas saif ali khan and kriti sanon starrer adipurush action trailer released full of vfx | Adipurush : 'आदिपुरुष'चा दुसरा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज, VFXचा जबरदस्त अनुभव देणाऱ्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता

Adipurush : 'आदिपुरुष'चा दुसरा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज, VFXचा जबरदस्त अनुभव देणाऱ्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता

googlenewsNext

बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा सध्या चर्चेत आहे. सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आणि सर्वच आश्चर्यचकित झाले. टीझरमध्ये झालेल्या चुकांनंतर त्या सुधारुन दिग्दर्शक ओम राऊत यांनी जबरदस्त ट्रेलर रिलीज केला. दमदार व्हिएफएक्स, म्युझिक, खिळवून ठेवणारे शॉट्स पाहून रामायणात हरवून गेल्यासारखं होतं. आता 'आदिपुरुष'चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अॅक्शनने भरलेल्या या दुसऱ्या ट्रेलरने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

फिल्मी रसिकांना १६ जूनची प्रतिक्षा आहे. मोठ्या पडद्यावर जबरदस्त VFX सह रामायणाची कथा दाखवणारा 'आदिपुरुष' ची सगळीकडेच चर्चा आहे. फिल्मचा अॅक्शन ट्रेलर बघण्यासाठी हजारो प्रेक्षक तिरुपतीला जमा झाले. अभिनेता प्रभासने तिरुपती बालाजीचे दर्शन घेत अॅक्शन ट्रेलर लॉंच केले. हा अॅक्शन ट्रेलर २ मिनिट २४ सेकेंदांचा आहे. यामध्ये साधूच्या वेषात आलेल्या रावणाची झलक दिसते. तर संपूर्ण वानरसेना श्रीरामाच्या बाजूने येऊन जे युद्ध होतं त्याचा हा छोटा ट्रेलर आहे.  'न्यायाच्या दोन पायांमधील अन्यायाचा नाश करण्यासाठी, जानकीला घेऊन जाण्यासाठी आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी मी येत आहे' या प्रभासच्या डायलॉगने अंगावर शहारे उभे राहतात.

'आदिपुरुष'चा हा नवीन ट्रेलर रामभक्तीमध्ये हरवणारा आहे. मोठ्या पडद्यावर राम आणि सीतेला बघून भावूक व्हायला होते. तर रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खाननेही जबरदस्त अभिनय केला आहे.  'आदिपुरुष' १६ जून रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: prabhas saif ali khan and kriti sanon starrer adipurush action trailer released full of vfx

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.