सोनं अन् चांदीने जडवलेल्या साडीत शोभून दिसतेय प्राजक्ता माळी, किंमत माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:55 PM2024-10-11T13:55:55+5:302024-10-11T13:57:17+5:30
केशरी रंगाची एक सुंदर पैठणी नेसून प्राजक्ता कार्यक्रमाला पोहचली.
Prajakta Mali : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यांगना, निवेदक आणि व्यावसायिका सुद्धा आहे. एवढंच नाही तर ती आता एक चांगली निर्मिती सुद्धा बनली आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचा 'फुलवंती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'फुलवंती' हा प्राजक्ताचा पहिलाच निर्मित सिनेमा आहे. त्यामुळे तिचं निर्माती बनण्याचं स्वप्न साकार झालं आहे. 'फुलवंती' या सिनेमाच्या प्रिमियरला प्राजक्ता ही एक खास पैठणी नेसून पोहचली होती.
नुकतंच 'फुलवंती' या सिनेमाचा प्रिमियर पार पडला. यासाठी प्राजक्ता खास तयार झाली होती. केशरी रंगाची एक सुंदर पैठणी नेसून प्राजक्ता कार्यक्रमाला पोहचली. तिने पैठणीवर सुंदर हिरव्या रंगाचे ब्लॉऊज परिधान केलं होतं. त्यावर तिने गळ्यात सुंदर हार घातला होता आणि नाकात घातलेल्या नथनीने तिच्या सौंदर्यांत आणखी भर पडली. प्राजक्ता नेसलेली ही पैठणी साधी सुधी नाहीतर लाखमोलाची आहे. तिच्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला तर धक्काच बसेल.
प्राजक्ताने इट्स मज्जाशी बोलताना या पैठणीची किंमत सांगितली. ही पैठणी एक दोन नाही तर तीन लाखांची आहे. कारण, ही पैठणी सोनं आणि चांदीने जडवलेली आहे. प्राजक्ता म्हणाली, "मला असे कळलेलं दीड लाख. पण, डिझायनर म्हणतोय की तीन लाख. तर ही तीन लाखांची साडी असेल. कारण, ही साडी विणताना यात चांदी भरलेली आहे आणि त्याला सोन्याचं लेपण केलेलं आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी जडवलेली ही साडी आहे. ही साडी जड आहे".
'फुलवंती' आज ११ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. स्नेहल तरडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात उतरली आहे. 'फुलवंती'सिनेमाचा ट्रेलर, त्यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच प्राजक्ताचा लुकची आणि तिच्या लावणीची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. 'फुलवंती'च्या भूमिकेत प्राजक्ता माळी आणि व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील गश्मीर महाजनी आहे. तर याशिवाय, 'फुलवंती'मध्ये गौरव मोरे, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, चेतना भट, रोहित माने यांच्या छोट्या भूमिका आहेत.