प्रसाद खांडेकरचा लेक शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान'च्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:48 PM2023-11-02T15:48:02+5:302023-11-02T15:48:39+5:30

प्रसादचा लेक श्लोक देखील शाहरुखचा जबरा फॅन आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने त्याच्या लेकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

prasad khandekar son dance on jawan movie song on shah rukh khan birthday video viral | प्रसाद खांडेकरचा लेक शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान'च्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

प्रसाद खांडेकरचा लेक शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान'च्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच किंग खानचे दिवाने आहेत. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अनेक नवोदित कलाकार शाहरुखला त्यांचा आदर्श मानतात. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरनेही एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

प्रसादचा लेक श्लोक देखील शाहरुखचा जबरा फॅन आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने त्याच्या लेकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्लोक शाहरुखच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटातील चलैय्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने "माझ्या प्रिन्सकडून किंग खान तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत प्रसादच्या लेकाचं कौतुक केलं आहे. 

प्रसाद सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेली कित्येक वर्ष विनोदाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या प्रसादला हासज्यत्रेने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. प्रसादने अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. 

Web Title: prasad khandekar son dance on jawan movie song on shah rukh khan birthday video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.