प्रथमेश-भाग्यश्रीची जीवलग दोस्ती

By Admin | Published: April 25, 2016 03:16 AM2016-04-25T03:16:43+5:302016-04-25T03:16:43+5:30

मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट असते. मित्र सोबत असेल तर सबकुछ आणि सोबत नसेल, तर कुछ भी नही असेच हे धोरण असते.

Prathamesh-Bhagyashree's wonderful friendship | प्रथमेश-भाग्यश्रीची जीवलग दोस्ती

प्रथमेश-भाग्यश्रीची जीवलग दोस्ती

googlenewsNext

मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट असते. मित्र सोबत असेल तर सबकुछ आणि सोबत नसेल, तर कुछ भी नही असेच हे धोरण असते. विशेषत: जेव्हा तुम्ही कॉलेजला प्रवेश घेता, तेव्हा खरं हे मैत्रीचं प्रेमळ भूत आपल्या मानेवर बसतं आणि मग मित्र म्हणेल ती पूर्व दिशा म्हणत, आपणही त्याच्या प्रत्येक बाबतीत न सांगता, न बोलावता सामील होत असतो.
अशाच खऱ्याखऱ्या मित्र-मैत्रिणींची जोडी पडद्यावर आपल्या भेटीला येतेय, ती दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांच्या आगामी ‘35% काठावर पास’ या चित्रपटाच्या माध्यमातून. हे मित्रमैत्रीण दुसरे तिसरे कोणी
नसून, महाराष्ट्राचा लाडका दगडू आणि चिऊ; म्हणजेच प्रथमेश परब आणि भाग्यश्री संकपाळ होय. बी. पी. अर्थात, ‘बालक पालक’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या प्रथमेश आणि भाग्यश्री या दोघांची गट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जी जमली, ती आजतागायत तशीच टिकून आहे. विशेष म्हणजे, खऱ्या आयुष्यात अत्यंत चांगली मैत्री असणारे हे दोघे पडद्यावरही मित्राच्याच भूमिकेत पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत...! ‘35% काठावर पास’ या चित्रपटात प्रथमेशच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका भाग्यश्री साकारते आहे. पडद्यामागेही या दोघांची दंगामस्ती तशीच सुरू असते,
जशी आपण पडद्यावर पाहतो. त्यामुळे ‘बालक-पालक’सारखीच किंबहुना, त्याहूनही अधिक धमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, असे खात्रीने
म्हणता येईल...!

Web Title: Prathamesh-Bhagyashree's wonderful friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.