प्रथमेश परबने सांगितला 'टाइमपास 3'च्या शूटिंगचा धमाल अनुभव, म्हणाला-कॉलेजमध्ये माझीही....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 04:44 PM2022-09-15T16:44:00+5:302022-09-15T17:36:56+5:30
‘टाइमपास 3’चं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून त्यात प्रथमेश परब व हृता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत आहेत
मराठी फ्रँचाईझी ‘टाइमपास’ प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय ठरली असून या फ्रँचाईझीचं वर्णन आता ‘इमोशन’ म्हणून केलं जातंय. ‘टाइमपास’ ओटीटी प्लॅटफॉर्म सज्ज झाला असून 16 सप्टेंबर रोजी टाइमपास 3 ZEE5 पाहायला मिळणार आहे. फ्रँचाईझीमधले पहिले दोन्ही सिनेमे या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून त्यात प्रथमेश परब व हृता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत आहेत. 36 टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजमध्ये पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं हे या या सिनेमात पाहायला मिळेल. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (हृता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचं हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमात उलगडेल.
टाइमपास 3 मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा कॉलेजच्या अविस्मरणीय दिवसांत घडत असल्यामुळे सगळ्या कलाकारांनीही शूटिंगदरम्यान नॉस्टॅल्जिया अनुभवला.
याविषयी अभिनेता प्रथमेश परब म्हणाला, ‘दगडूच्या मित्रांच्या गँगप्रमाणेच कॉलेजमध्ये माझीही गँग होती. फरक इतकाच होता, की दगडू इतरांचे सल्ले ऐकत बसतो आणि प्रत्यक्षात मी स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. टाइमपास 3 चं शूटिंग करताना, दगडूची सिग्नेचर पोझ देताना, त्याचे धमाल पंचलाइन्स, जबरदस्त स्टारकास्ट, शिवाय निसर्गरम्य ठिकाणी रोमँटिक सीन्स करताना मला खूप मजा आली. टाइमपास 3 नं मला कित्येक आठवणी दिल्या आणि त्या कायम लक्षात राहातील.’