छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका दीड वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'या' दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:37 PM2024-07-05T15:37:05+5:302024-07-05T15:40:01+5:30

सोनी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकही भावुक झाले आहेत.

pratishodh jhunj astitvachi sony marathi serial goes off air amol bawdekar | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका दीड वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'या' दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका दीड वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप, 'या' दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

टेलिव्हिजन हे भारतीयांचं आवडतं मनोरंजनाचं साधन आहे. टीव्हीवरील अनेक मालिका लोकप्रिय ठरल्या. आपल्या आवडत्या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात आणि त्या मालिकेचा एकही भाग ते चुकवत नाहीत. त्यामुळेच एखादी मालिका बंद होणार असेल तर प्रेक्षकही भावुक होतात. आता सोनी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

गेल्या वर्षी सोनी मराठीवर 'प्रतिशोध झुंज अस्तित्वाची' ही मालिका सुरू झाली होती. पहिल्यांदाच वेगळा विषय या मालिकेतून हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष यांची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेत अभिनेता अमोल बावडेकर, पायल मेमाणे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या मालिकेत अमोल पहिल्यांदाच वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसला. प्रतिशोध मालिकेत त्याने एका तृतीयपंथीची भूमिका साकारून त्यांची हळवी बाजू दाखवून दिली. या मालिकेत त्याने ममता ही तृतीयपंथी आईची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री पायल दिशाच्या भूमिकेत होती. 

'प्रतिशोध झुंज अस्तित्वाची' ही मालिका जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. शुक्रवारी(५ जुलै) या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. 

Web Title: pratishodh jhunj astitvachi sony marathi serial goes off air amol bawdekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.