लॉकडाउनमध्ये सिद्धार्थने केली होती आर्थिक मदत; प्रत्युषाच्या वडिलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 05:49 PM2021-09-04T17:49:42+5:302021-09-04T17:50:53+5:30

Sidharth shukla: सिद्धार्थच्या निधनानंतर प्रत्युषा बॅनर्जीच्या वडिलांनी एका मुलाखतीत सिद्धार्थच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

pratyusha banerjee father reveals that sidharth shukla sent rupees 20000 during lockdown | लॉकडाउनमध्ये सिद्धार्थने केली होती आर्थिक मदत; प्रत्युषाच्या वडिलांचा खुलासा

लॉकडाउनमध्ये सिद्धार्थने केली होती आर्थिक मदत; प्रत्युषाच्या वडिलांचा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे'मला नाही माहित हे सगळं कसं काय घडलं. मी त्याला माझा मुलगा मानत होतो.'

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं २ सप्टेंबर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. काल( ४ सप्टेंबर) सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, सिद्धार्थच्या निधनामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यासोबतच त्याच्या काही आठवणींनाही उजाळा देत आहेत. यामध्येच लॉकडाउनच्या काळात सिद्धार्थ दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या वडिलांना आर्थिक मदत केल्याचं समोर आलं आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर प्रत्युषा बॅनर्जीच्या वडिलांनी एका मुलाखतीत सिद्धार्थच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्येच लॉकडाउनच्या काळात सिद्धार्थने आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली होती असंही त्यांनी सांगितलं.

"मला नाही माहित हे सगळं कसं काय घडलं. मी त्याला माझा मुलगा मानत होतो. बालिका वधूच्या काळात सिद्धार्थ आणि प्रत्युषा या दोघांची खूप छान मैत्री झाली होती. त्यामुळे अनेकदा तो आमच्या घरीदेखील यायचा. पण, प्रत्युषाच्या निधनानंतर लोक प्रत्युषा आणि सिद्धार्थच्या नात्याची चर्चा करु लागले. त्यामुळे मग सिद्धार्थने आमच्या घरी येणं बंद केलं. पण तो मेसेजच्या माध्यमातून माझ्या संपर्कात होता", असं प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "या लॉकडाउनच्या काळातही तो सातत्याने माझ्या संपर्कात होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने मला शेवटचा मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्याने माझी आणि माझ्या पत्नीची चौकशी केली होती. तसंच आर्थिक मदतीचीही विचारणा केली होती. विशेष म्हणजे त्याने बळजबरीने मला २० हजार रुपयांची मदत केली होती."

कमवतोस किती? विचारणारी मायरा एका एपिसोडसाठी घेते तब्बल इतकं मानधन
 

दरम्यान, 'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जीने स्क्रीन शेअर केली होती. मात्र, काही वर्षांपूर्वीच प्रत्युषाचं निधन झालं. तर. आता सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. त्यामुळेच केल्या दोन दिवसांपासून बालिका वधुचा अंत झाला अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

Web Title: pratyusha banerjee father reveals that sidharth shukla sent rupees 20000 during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.