इफ्तार पार्टीत प्रेग्नेंट सना खानची झाली वाईट अवस्था, नवऱ्याने सगळ्यांसमोरच केलं असं कृत्य; नेटकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:26 PM2023-04-17T12:26:22+5:302023-04-17T15:19:36+5:30
सना खानचा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या नवऱ्यावर प्रचंड संतापले. अखरे सनाला स्पष्टीकरण द्यायला लागलं.
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी रंगते. अनेक सेलिब्रिटी या पार्टीला हजेरी लावतात. दरवर्षी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी रमजान महिन्यात या पार्टीचं आयोजन करतात. या इफ्तार पार्टीला सलमान खान, शहनाज गिल, राघव जुयास, सुभाष घई, चंकी पांडे, एमसी स्टॅन, साजिद खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध स्टार्स पोहोचले. प्रेग्नेंट सना खानही पती मुफ्ती अनससोबत पार्टीत पोहोचली होती, पण यादरम्यान असं काही झालं की तिचा नवरा ट्रोलच्या निशाण्यावर आला. या व्हिडिओवर चाहते प्रचंड संतापले. आता सनाने त्याच व्हिडिओवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
सना खान प्रेग्नेंट आहे. २०२०मध्ये तिचं लग्न झाला आणि आता ती लवकरच आई होणार आहे. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुफ्ती अनस तिचा हात धरून तिला ओढून जबरदस्तीने नेट आहे. व्हिडिओमध्ये सना खान थकल्याचं स्पष्ट दिसत आहे. यामध्ये ती थकल्यामुळे आता काही करू शकणार नाही, असेही नवऱ्याला सांगत आहे. पण तो तिचं न ऐकता तिला ओढत घेऊन जातो. आता त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी, 'पत्नी असली म्हणून असं वागणं बरोबर नाही,' 'तिला श्वास घेऊ द्या' अशा कमेंट केल्या आहेत. आता या सगळ्या प्रकारावर सना खानने स्पष्टीकरण दिल आहे. या व्हिडिओवर कमेंट करत तिने लिहिलंय कि, 'हा व्हिडिओ नुकताच मी पहिला आहे. आणि मला माहित आहे की हा व्हिडिओ माझ्या सर्व बंधू आणि बहिणींसाठी, अगदी माझ्यासाठीही विचित्र आहे. पण यात दिसतंय तसं काही घडलं नाही. गाडीतून बाहेर येताच आमचा ड्रायव्हरशी संपर्क तुटला.'
सना खान पुढे म्हणाली, 'मी जास्त वेळ उभी राहिले आणि मला घाम येऊ लागला आणि मला अस्वस्थ वाटू लागले. याच कारणामुळे अनसला मला पटकन आत घेऊन जायचे होते जेणेकरून मी बसू शकेन आणि पाणी पिऊ शकेन. मीच त्याला घाई करायला सांगितली कारण सर्व पाहुण्यांचे फोटो क्लिक करणाऱ्या फोटोग्राफर्सना आम्हाला त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओचा चुकीचा अर्थ घेऊ नका हीच विनंती. तुमच्या काळजीबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. सर्वांना खूप खूप प्रेम.'