RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:45 AM2023-01-11T11:45:04+5:302023-01-11T11:47:18+5:30

Naatu Naatu Golden Globes : नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं.

Prem Rakshit choreographed RRR Naatu Naatu song prepared 97 dance movements wanted to commit suicide | RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

googlenewsNext

एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाने इतिहास रचला आहे. या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंगचा अवॉर्ड मिळाला. जशी याची घोषणा झाली तिथे असलेल्या राजामौली, रामचरण आणि जूनियर एनटीआर यांनी एकच जल्लोष केला. या गाण्याच्या यशाचं श्रेय जेवढं जूनियर एनटीआर,  रामचरण आणि राजामौली यांना जातं, ते तेवढंच कोरिओग्राफर प्रेम रक्षित (Prem Rakshit) यालाही जातं. चला जाणून घेऊ त्याच्याबाबत...

नाटू नाटू गाण्याचं शूटींग यूक्रेनमध्ये झालं होतं. कारण त्यावेळी भारतात लॉकडाऊन लागला होता. या गाण्यासोबतच काही सीन्सचंही शूटींग तिथेच करण्यात आलं. 'नाटू नाटू' गाणं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांच्या महालात शूट करण्यात आलं होतं. रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआर ने या गाण्याची एक महिला रिहर्सल केली होती. तर गाण्याचं शूट 2 आठवड्यांमध्ये करण्यात आलं.

गाण्याचे 80 व्हेरिएशन, Jr NTR-रामचरणने दिले 18 रिटेक

'नाटू नाटू' गाण्यात ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरणची फूट टॅपिंग परफॉर्मंस आजही सगळ्यांना अवाक् करते. रिपोर्ट्सनुसार, या गाण्याच्या हुकस्टेपसाठी 80 व्हेरिएशन तयार करण्यात आले होते. तेच रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआरने यासाठी 18 रिटेक दिले होते. नंतर जेव्हा राजामौली यांनी सगळे रिटेक बघितले तेव्हा दुसरा जास्त आवडला. तोच सिलेक्ट केला गेला. 'नाटू नाटू' तेलुगू गाणं आहे. हे गाणं राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव यांनी गायलं तर एमएम कीरावनी यांनी कंपोज केलं.

1 महिना चाललं 97 डान्स मुव्ह्सवर काम

प्रेम रक्षितने 'सिनेजोश' दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'नाटू नाटू' गाण्यावर त्याने एका महिन्यात 97 डान्स मुव्ह्सवर काम केलं होतं. राम चरण आणि ज्यूनिअर एनटीआर यांच्या डान्स स्टेप्स सिंक होत आहेत की नाही हे बघण्यासाठी राजामौली प्रत्येक फ्रेम फ्रीज करून पाहात होते. 

आत्महत्या करणार होता प्रेम रक्षित, पण...

वाचून तुम्हाला धक्का बसेल की, ज्या नाटू नाटू गाण्याची जगभरात चर्चा होत आहे आणि जे गाणं कोरियोग्राफर प्रेम रक्षितने बसवलं तो कधी आत्महत्या करणार होता. त्याने मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याचा परिवार आर्थिक अडचणीत होता. त्याने विचार केला होता की, त्याने जर आत्महत्या केली तर त्याची डान्स यूनियन फेडरेशन त्याच्या परिवाराला 50 हजार रूपये देतील. त्यासाठी तो चेन्नईच्या मरीना बीचवरही गेला होता. तिथे तो एका सायकलने गेला होता. ती सुद्धा उधारीवर घेतलेली होती. त्याने विचार केला की, ज्या व्यक्तीची ही सायकल आहे तोही नंतर त्याच्या घरी जाऊन पैसे मागेल. त्यामुळे ती सायकल परत करण्यासाठी तो माघारी आला. तेव्हाच तिथे त्याला वडिलांचा फोन आला आणि त्यांनी प्रेम रक्षितला सांगितलं की, त्याला एका सिनेमासाठी डान्स एक्स्ट्रा म्हणून कामाची ऑफर मिळाली आहे. तेव्हा तो परत आला आणि त्यानंतर त्याने 2002 मध्ये कोरियोग्राफर म्हणून करिअर सुरू केलं.

Web Title: Prem Rakshit choreographed RRR Naatu Naatu song prepared 97 dance movements wanted to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.