स्वप्नपूर्ती! अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:31 AM2024-10-14T09:31:00+5:302024-10-14T09:31:25+5:30

अभिनेत्रीने आपल्या नव्या घराची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली

Premachi Goshta Fame Actress Komal Somare Gajmal Bought New House In Mumbai Shares Phots | स्वप्नपूर्ती! अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश!

स्वप्नपूर्ती! अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला गृहप्रवेश!

Komal Somare Gajmal  : मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही वर्षांत मुंबईत स्वत:चं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. आता अभिनेत्री कोमल सोमारे गजमलने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. 

अभिनेत्री कोमल सोमारे गजमल ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरांत पोहचली. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुळची लातूरची असलेल्या कोमलचं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. अखेर ते स्वप्न पुर्ण झालं असून कोमल आता मुंबईकर झाली आहे. 


कोमलने आपल्या घराची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोंंमध्ये गृहप्रवेश पूजन पाहायला मिळत आहे. "जेव्हा स्वप्नपूर्ती होते, शुभ दसरा", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. सध्या अभिनेत्रीवर कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील तिचे सहकलाकार तेजश्री प्रधान, राज हंचनाळे यांनी कमेंट करत तिला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Premachi Goshta Fame Actress Komal Somare Gajmal Bought New House In Mumbai Shares Phots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.