पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक ५ एप्रिलऐवजी आता 'ह्या' दिवशी होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 08:05 PM2019-03-15T20:05:00+5:302019-03-15T20:05:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरेंद्र मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमारने केले आहे.
हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले असून आता हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ही माहिती खुद्द ओमंग कुमारने ट्विटरवर दिली आहे.
Proud to announce the release date of my film #PMNarendraModi 12th April 2019... Stars @vivekoberoi Produced by @sandip_Ssingh#SureshOberoi and @anandpandit63
— Omung Kumar B (@OmungKumar) March 15, 2019
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विवेकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायला टाके पडले होते. ही घटना घडली तेव्हा विवेक उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये चित्रीकरण करत होता. विवेक ऑबेरॉय हर्षिल धराली व गंगाच्या किनारी शूटिंग करत होता. त्यावेळी विवेक अनवाणी गंगा नदीच्या किनारी चालत होता. त्यावेळी त्याच्या पायात झाडाची टोकदार फांदी पायात घुसली. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी सेटवर डॉक्टर उपस्थित होते. जखम जास्त असल्यामुळे डॉक्टरांना टाके घालावे लागले. पायाला दुखापत झालेली असतानाही त्याने चित्रीकरण केले आणि त्यानंतर संपूर्ण टीम हर्षिलमधून देहरादूनसाठी रवाना झाले. उत्तराखंडमध्ये मोदी यांच्या सुरूवातीपासूनच्या जीवन प्रवासापासून राजकीय प्रवासांचे दृश्य चित्रीत केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदींच्या भूमिकेत विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. तर अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी तर मोदींची आई हिराबेनच्या भूमिकेत जरीना वहाब दिसणार आहे. त्यांची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता निभावणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहेत. नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.