'पृथ्वीराज' देशातील शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवावा, अक्षय कुमारने सरकारला केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:52 PM2022-05-09T18:52:17+5:302022-05-09T18:56:00+5:30

आपल्या 'पृथ्वीराज' या ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या विशेष प्रसंगी अक्षय कुमार म्हणाला की, मला अभिमान आहे की मला भारताचा महान सुपुत्र सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

Prithviraj is an educational film akshay kumar should be shown in schools | 'पृथ्वीराज' देशातील शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवावा, अक्षय कुमारने सरकारला केली विनंती

'पृथ्वीराज' देशातील शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवावा, अक्षय कुमारने सरकारला केली विनंती

googlenewsNext

अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज या सिनेमाचा भव्य ट्रेलर लॉन्च केला.  या सिनेमात अक्षय सोबत मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील आहे. . या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या साहसाची कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाबाबत आधीच फॅन्समध्ये क्रेझ निर्माण झाली आहे.

आपल्या 'पृथ्वीराज' या ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या विशेष प्रसंगी अक्षय कुमार म्हणाला की, मला अभिमान आहे की मला भारताचा महान सुपुत्र सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये मला अशा प्रकारच्या भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली नव्हती. डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदींनी जेव्हा ही महान व्यक्तिरेखा साकारायला सांगितली तेव्हा मला माझे  जीवन सफल झाले आहे, असं वाटलं.'

अभिनेत्याला असेही वाटते की हा चित्रपट प्रत्येक मुलाने पाहिला पाहिजे जेणेकरून त्यांना अभिमानी योद्ध्याचा इतिहास मिळेल. खिलाडी कुमार म्हणाला, "मला माझ्या दिग्दर्शकाने 'पृथ्वीराज रासो' वाचण्यासाठी एक पुस्तक दिले होते. मी हळूहळू पुस्तक वाचले आणि मला कळले की ते किती महान योद्धे होते. पण शाळेमध्ये या इतिहासाबाबत फार कमी माहिती दिलीय. शालेय पुस्तकांमध्ये फक्त एक पॅरेग्राफ असतो. त्यामुळेच  चित्रपट शाळांमध्ये विद्यार्था्यांनी दाखवणं हे सरकारनं आनिवार्य करावं. त्यामुळे मुलांना देशाच्या इतिहासाची माहिती मिळेल.'' पृथ्वीराजच्या ट्रेलर लाँचच्यावेळी अक्षय कुमार आईच्या आठवणीत भावूक झाला. म्हणाला, आज जर माझी आई असती तर तिला या सिनेमातील माझी भूमिका पाहता आली असती. 

‘पृथ्वीराज’ हा या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूडपटांपैकी एक आहे. आत्तापर्यंतचा अक्षयचा हा एक मोठा बिग बजेट सिनेमा आहे. साहजिकच या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. ‘पृथ्वीराज’शिवाय रक्षाबंधन, मिशन सिंड्रेला, राम सेतू, सेल्फी अशा अनेक आगामी सिनेमांमध्ये अक्षय दिसणार आहे.

Web Title: Prithviraj is an educational film akshay kumar should be shown in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.