प्रियांका भोजपुरीत?

By Admin | Published: May 9, 2016 01:42 AM2016-05-09T01:42:22+5:302016-05-09T01:42:22+5:30

देसी गर्ल प्रियंका चोप्राचा डंका आता बॉलिवूडपासून ते थेट हॉलिवूडपर्यंत चांगलाच वाजू लागला आहे. हिंदी सिनेरसिकांसह हॉलिवूडमध्येही रसिकांनी तिला डोक्यावर घेतलं आहे.

Priyanka Bhojpuri? | प्रियांका भोजपुरीत?

प्रियांका भोजपुरीत?

googlenewsNext

देसी गर्ल प्रियंका चोप्राचा डंका आता बॉलिवूडपासून ते थेट हॉलिवूडपर्यंत चांगलाच वाजू लागला आहे. हिंदी सिनेरसिकांसह हॉलिवूडमध्येही रसिकांनी तिला डोक्यावर घेतलं आहे. हॉट अंदाज, सेक्सी अदा आणि इंग्रजी भाषा यामुळं तिनं रसिकांवर गारुड घातलं आहे. आता हीच पिग्गी चॉप्स भोजपुरी बोलताना दिसली तर आश्चर्यचकीत होऊ नका.. हे आम्ही नाही तर प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनीच म्हटलं आहे. बॉलिवूड, हॉलिवूडसोबतच प्रादेशिक सिनेमा करण्यात प्रियंकाला कोणतीही अडचण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एखादा चांगला विषय आणि चांगली स्क्रीप्ट आली तर प्रियांका नक्कीच भोजपुरी सिनेमाही करेल असा विश्वास मधू यांनी व्यक्त केला आहे. याआधी प्रियांकानं तेलुगू आणि तमिळ सिनेमात काम केलंय. त्यामुळं प्रादेशिक भाषेच्या सीमांमध्ये न अडकता ती चांगला विषय स्वीकारते असं त्यांनी आवर्जून सांगितलंय.

Web Title: Priyanka Bhojpuri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.