'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:17 AM2023-04-25T11:17:00+5:302023-04-25T11:18:03+5:30
इतकंच नाही तर तिच्यावर केसही दाखल होण्याची शक्यता आहे.
'बिग बॉस 16' मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी (Priyanka Chahar Chaudhary) अडचणीत सापडली आहे. तिच्यावर फॅशन स्टाईल चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिच्यावर केसही दाखल होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनकर इशिता गुप्ताने (Ishita Gupta) प्रियंकावर हे गंभीर आरोप केले आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रियंका चौधरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. यामध्ये तिने रफल लेहेंगा परिधान केला होता. या फोटोंने चांगलीच पसंती मिळाली. लुक्स, फॅशन सेन्समुळे प्रियंकाचे नेहमीच कौतुक होते. मात्र आता तिच्यावर थेट चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. डिझायनर इशिता गुप्ताने दावा केला आहे की हे डिझाईन तिचे आहेत आणि तिने या आऊटफिट्सना एक्सक्लुझिव्ह बनवलं होतं. इशिताने प्रियंका विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली आहे.
फॅशन डिझायनर इशिताने दोन ट्वीट केले आहेत. तिने लिहिले,'हिला वाटतं की ही माझ्यासारखं दिसायचा प्रयत्न करेल. किंवा माध्यासारखे कपडे घालेल. हो पण कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. 30 हजार पाऊंड चे माझे कपडे चोरले आणि मी त्यावर काहीच नाही बोलले. '
@MumbaiPolice this is baseless and false and is the work of #PriyankaChaharChaudhary and her PR team. I’m away from India so can’t file a fake report complaint but when I’m back which is soon we shall pursue this. Please store this as electronic evidence for future.
— ISHITA (@ishitarehagupta) April 23, 2023
Have a good… pic.twitter.com/HUWCC7MyST
इशिताने आणखी एक ट्वीट करत लिहिले,'जर माझ्याकडे मागितलं असतं तर मी दिलं असतं. मात्र मार्केटिंगची ही योग्य पद्धत नाही. स्वत:च्या बळावर मार्केटिंग करा. मला अशा अडाणी लोकांसोबत यायची काही इच्छा नाही.'