Priyanka Chopra back To Mumbai: लेक मालती शिवाय भारतात परतली प्रियंका चोप्रा, नेटकरी म्हणाले - लेक कुठेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:38 PM2022-11-01T12:38:37+5:302022-11-01T12:39:09+5:30

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने ३ वर्षांनी भारतात परतल्याचा आनंद व्यक्त केला. दरम्यान, प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एअरपोर्टवर दिसत आहे.

Priyanka Chopra back To Mumbai: Priyanka Chopra returned to India without Lake Malti, Netkari said - Where is the lake? | Priyanka Chopra back To Mumbai: लेक मालती शिवाय भारतात परतली प्रियंका चोप्रा, नेटकरी म्हणाले - लेक कुठेय?

Priyanka Chopra back To Mumbai: लेक मालती शिवाय भारतात परतली प्रियंका चोप्रा, नेटकरी म्हणाले - लेक कुठेय?

googlenewsNext

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra)ने ३ वर्षांनी भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरम्यान, प्रियांका आता भारतात पोहोचली आहे. प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विमानतळावर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका खूप आनंदी दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इतक्या वर्षांनंतर देसी गर्ल घरी परतल्याने तिचे चाहतेही खूप खूश आहेत. 

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा नेव्ही ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. मोकळ्या केसांमध्ये आणि आरामदायक कपड्यांमध्ये प्रियांका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. प्रियांकाच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्सकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'प्रियांका तुला भारतात पाहून खूप आनंद झाला. तर तिथे आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'प्रत्येक भारतीयाला प्रियांकाचा अभिमान वाटला पाहिजे'. त्याचवेळी दुसरा यूजर लिहितो की, 'क्वीन आली आहे'. अशा अनेक कमेंट पोस्टवर आल्या आहेत.

तसेच अमेरिकेत प्रियांका पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रासोबत राहते. सध्या प्रियांका एकटीच भारतात आली आहे. मात्र, या व्हिडिओवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही आल्या आहेत. तिची लेक मालतीबद्दल चाहत्यांनी विचारलं, ती कुठे आहे?. दिवाळीच्या निमित्ताने प्रियांकाने निक आणि मुलगी मालतीसोबतचे तिचे काही गोंडस फोटो शेअर केलेत. दिवाळीच्या या सेलिब्रेशनमध्ये तिघेही ऑफ व्हाइट कलरच्या पोशाखात दिसले होते.

Web Title: Priyanka Chopra back To Mumbai: Priyanka Chopra returned to India without Lake Malti, Netkari said - Where is the lake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.