प्रियांका चोप्रा बनणार अंतराळवीर

By Admin | Published: April 25, 2017 05:48 PM2017-04-25T17:48:39+5:302017-04-25T17:48:39+5:30

दिवंगत पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार आहे.

Priyanka Chopra to become Astronaut | प्रियांका चोप्रा बनणार अंतराळवीर

प्रियांका चोप्रा बनणार अंतराळवीर

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणून परिचित असलेली प्रियांका चोप्रा आताच हॉलिवूडमधील चित्रपटांची शूटिंग संपवून भारतात परतली आहे. हॉलिवूडमधून ती पुन्हा बॉलिवूडकडे वळण्याच्या तयारीत असल्याचं खात्रीलायक वृत्त समजलं आहे. दिवंगत पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार आहे. मायदेशात परतल्यानंतर ती या बॉलिवूड चित्रपटासाठी करारबद्ध झाली आहे. 

हरियाणात जन्मलेली कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती. परत येताना मात्र यानामध्ये बिघाड झाल्यानं अपघातात तिचा मृत्यू झाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रिया मिश्रा आहेत. प्रिया यांनी सांगितलं की, मी यावर गेल्या सात वर्षांपासून काम करतेय. एक नवा प्रोडक्शन बॅनर या प्रोजेक्टला प्रोड्युस करणार आहे. चित्रपट निर्माते कल्पना चावलाच्या कुटुंबीयांच्याही संपर्कात आहेत. त्यांच्याशी या चित्रपटासंदर्भात निर्मात्यांनी बातचीतही केली आहे. प्रिया मिश्रानं कल्पना चावलावर सिनेमा बनवण्यासाठी 2011मध्ये एका टीव्ही चॅनेलमधील नोकरी सोडली होती. 

या सिनेमासाठी तिनं दिवस-रात्र एक करून खूप मेहनत घेतली आहे. अनेक अभिनेत्रींच्या नावाची या बायोपिकसाठी चर्चा असतानाच प्रियांका चोप्रानं या चित्रपटाला होकार दिला, त्यामुळे चित्रपटाची दिग्दर्शिका प्रिया मिश्राला आनंद झाला आहे. अंतराळवीरावर बनणारा दुसरा चित्रपट ठरणार आहे. तत्पूर्वी "चंदामामा दूर के", या सिनेमात सुशांत सिंग राजपूत यानं प्रमुख भूमिका निभावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रोजेक्टचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार केला जाणार असून, नवी प्रोडक्शन कंपनी गेट वे या बायोपिकला प्रोड्युस करणार आहे.

Web Title: Priyanka Chopra to become Astronaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.