प्रियांका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग एक्ट्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:45 AM2018-07-31T11:45:27+5:302018-07-31T11:49:17+5:30

काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्राच्या पुढील बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियांका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार

Priyanka Chopra become top trending actress | प्रियांका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग एक्ट्रेस

प्रियांका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग एक्ट्रेस

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रियांका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.

काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्राच्या पुढील बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियांका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियांका सतत चर्चेत होती. त्यामुळेच प्रियांका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनलेली आहे.

सलमानच्या सिनेमा 'भारत'चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडियावर प्रियांका भारत चित्रपट सोडत असल्याची घोषणा करतानाच 'इन निक ऑफ टाइम' चा सूचक उल्लेख केला होता. त्यामुळे प्रियांका चर्चेत आली होती 94 गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी असलेली प्रियांका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.
 
स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "आपल्या वाढदिवसाच्या दरम्यान भारतात परतलेली प्रियांका निक जोनाससोबत गोव्यात फिरायला गेली होती त्यानंतर प्रियांकाने शोनालीची फिल्म आणि सलमानसोबत भारत हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. ह्यामूळे अर्थातच ती सतत बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आणि सोशलमीडियामध्ये चर्चेत राहिली. आता तर ‘भारत’ सोडल्यावर आणि तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांमूळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामुळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री झालीय. “ 
 
अश्वनी कौल पुढे म्हणतात, " 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

येत्या 16 सप्टेंबरला निक 26 वर्षांचा होतोय. याच दिवशी या कपलचा डबल सेलिब्रेशनचा प्लान असल्याचे कळतेय. अद्याप प्रियांका वा निक या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या लग्नाची तयारी सुरू झालीयं, इतपत चर्चा आहे. आता खरे काय नि खोटे काय, हे प्रियांका व निक या दोघांनाचं ठाऊक. पण दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेयं, इतके मात्र नक्की.

 

Web Title: Priyanka Chopra become top trending actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.