Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:12 PM2022-07-21T17:12:57+5:302022-07-21T17:50:24+5:30

Malti Unseen Photo :प्रियंका चोप्राची लेक मालतीची पहिली झलक समोर आली आहे. बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते.

Priyanka chopra celebrated her birthday with her daughter malti marie unseen photo here | Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल

Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल

googlenewsNext

Priyanka Chopra Daughter Malti Unseen Photo:बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)ची मुलगी मालतीचे फोटो आणि चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघतायेत,  आतापर्यंत अभिनेत्रीने तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. दरम्यान, प्रियंका चोप्राच्या मुलीचा एक अनसीन फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे.

बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो आला समोर 
प्रियंका चोप्राने 18 जुलै रोजी तिचा 40 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या खास प्रसंगी तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र जमले होते. प्रियंकाचा हा वाढदिवस देखील खास होता कारण ती पहिल्यांदाच तिची मुलगी मालती मेरीसोबत सेलिब्रेट करत होती. प्रियंकाने बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले होते पण तिने तिच्या मुलीसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. दरम्यान, तिची बेस्ट फ्रेंड  तमन्ना दत्तची एक पोस्ट समोर आली आहे ज्यामध्ये प्रियांका तिच्या मुलीला घेऊन उभी आहे. 


मैत्रिणींसोबत केलं सेलिब्रेशन 
प्रियांकाच्या बर्थ डे पार्टीला तमन्नाशिवाय नताशा पूनावालाही उपस्थित होती. तमन्नाने 3 फोटो शेअर केले आहेत. दोघेही कॅमेराकडे बघून पोझ देतायेत. प्रियंकाने ऑफ शोल्डर पिंक कलरचा तर तमन्नाने रेड कलरचा ड्रेस घातला आहे. प्रियंकाने मालती मेरीला घेऊन पोझ देते आहे. तमन्नाने मुलीचा चेहरा हार्ट इमोजीने लपवला आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. लवकरच ती 'सिटाडेल' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे, ज्याचे तिने नुकतेच शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट सोबत दिसणार आहे.
 

Web Title: Priyanka chopra celebrated her birthday with her daughter malti marie unseen photo here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.