Priyanka Chopra : ६५ वर्षांपूर्वीच्या साडीचा ड्रेस अन् रिक्षासमोरचं फोटोशूट, प्रियंका-निकची मुंबईच्या रस्त्यावर धम्माल मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:09 AM2023-04-03T11:09:46+5:302023-04-03T11:11:23+5:30
Priyanka Chopra Nick Jonas Date Night : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या भारतात मुक्कामी आहे. पती निक जोनास आणि लेक मालतीसोबत ती भारतात आलीये. साहजिकच सध्या प्रियंकाची जोरदार चर्चा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या भारतात मुक्कामी आहे. पती निक जोनास आणि लेक मालतीसोबत ती भारतात आलीये. साहजिकच सध्या प्रियंकाची जोरदार चर्चा आहे. काल परवा अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन समारंभालाही तिने हजेरी लावली होती. भारतात आल्याआल्या पती निक जोनाससोबत तिने मस्तपैकी फोटोशूटही केलं. ते सुद्धा ऑटोरिक्षासमोर उभं राहत..
याचे फोटो प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियंका ऑफ शोल्डर ड्रेस ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये आहे तर निक ब्लेझरमध्ये आहे. रिक्षाच्या बाहेर उभं राहून प्रियंका आणि निकने फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. प्रियंकाने हे फाेटो शेअर करताना तिच्या सुंदर पोशाखाबद्दलही लिहिलं आहे.
ती लिहिते, हा सुंदर पोशाख ६५ वर्षे जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीचा वापर करून बनवला गेला आहे. यात चांदीचे धागे गुंफले आहेत. खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग आहे.
प्रियंका चोप्राच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. १८ तासांत ३५ लाखांवर लोकांनी या फोटोंना लाइक केलं आहेत. हजारो कमेंट्स पडल्या आहेत.
प्रियंकापेक्षा रिक्षाचालकाचीच चर्चा
प्रियंका-निकच्या या फोटोमधील रिक्षाचालकाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रियंका व निक दोघंही फोटोसाठी पोझ देण्यात मग्न आहेत. तर रिक्षाचालक त्यांच्याकडे आश्चर्याने बघतोय. या फोटोवर युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. “ऑटोवाले अंकल तर फेमस झालेत, ” असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. “रिक्षावाले काका : कोण तुम्ही आधी भाडं द्या,” अशी कमेंट एकाने केली आहे. “ ऑटोवाले काका लेट होत आहेत, दीदी...,” असंही अन्य एकाने लिहिलं आहे.