उदास चेहरा, पाणावलेले डोळे; प्रियंका चोप्राला झालं तरी काय? चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:07 PM2024-07-25T15:07:53+5:302024-07-25T15:09:36+5:30
नेहमी हसतमुख राहणाऱ्या प्रियंकाने आज इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला.
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूड ते तेट हॉलिवूडपर्यंत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्रियंकाचे हॉलिवूड सिनेमेही गाजत आहेत. ती आजच्या घडीची यशस्वी अभिनेत्री आहे. पती निक जोनस आणि लेक मालती मेरीसोबत ती अमेरिकेतच स्थायिक आहे. प्रियंका तिच्या सोशल मीडियावर शूटिंग अपडेट्स आणि कुटुंबासोबत वेळ घालवतानाची झलक दाखवत असते. मात्र आज तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओने चाहते चिंतेत आहेत.
नेहमी हसतमुख राहणाऱ्या प्रियंकाने आज इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती कारमध्ये बसून सेल्फी व्हिडिओ घेत आहे. दरम्यान प्रियंका थोडी भावूक झालेली दिसत आहे. तिचे डोळे पाणावलेले जाणवत आहेत. 'just feeling it today #staymotivated' असं तिने कॅप्शन लिहिलं आहे. प्रियंकाचा आज थोडी भावनिक झाल्याचं या व्हिडिओतून दिसून येतंय.
प्रियंकाच्या व्हिडिओवरुन नेटकरी चिंतेत पडलेत. तिला नक्की काय झालंय? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. 'तू खूप स्ट्राँग आहेस आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 'तू बेस्ट आहेस आणि चांगलंच करत आहेस' असं म्हणत चाहत्याने तिला धीर दिला आहे.
प्रियंका चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियात असून 'द ब्लफ' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती सतत सेटवरचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच ती निकसह अंबानींच्या लग्नासाठी मुंबईत आली होती. सध्या तिचं बिझी शेड्युल पाहता तिला हा भावनिक ब्रेकडाऊन झाल्याची चर्चा आहे.