प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, "मी मान्य करते..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:05 PM2023-04-14T14:05:01+5:302023-04-14T14:07:08+5:30

शाहीद कपूर टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत होता आणि त्याने दरवाजा उघडला

priyanka chopra house IT raid shahid kapoor opened door actress revealed truth behind it | प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, "मी मान्य करते..."

प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, "मी मान्य करते..."

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे आपसात सूत जुळणे काही नवीन नाही. कधी कोणाची जोडी बनेल आणि कधी कोणाची जोडी तुटेल हे सांगता येत नाही. अशीच एक चर्चा होती प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) नात्याची. दोघंही सिरिअस रिलेशनशिपमध्ये होते इतकंच नाही तर प्रियंकाच्या घरी जेव्हा छापेमारी झाली तेव्हा शाहीद कपूरने दरवाजा उघडला होता अशीही अफवा पसरली होती. यावर प्रियंका एका मुलाखतीत स्पष्टच बोलली. 

शाहीद कपूर म्हणजे बॉलिवूडमध्ये 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जायचा. अनेक अभिनेत्री त्याच्यावर फिदा होत्या. करिना कपूर, विद्या बालन, अमृता राव आणि प्रियंका चोप्रा यांच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं. प्रियंका आणि शाहीद सिनेमाच्या शूटदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 साली प्रियंकाच्या घरी आयकर विभागाची धाड पडली. तेव्हा शाहीद कपूर टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत होता आणि त्याने दरवाजा उघडला अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. हे सत्य आहे की अफवा  यावर प्रियंकाने 'आप की अदालत' मध्ये खुलासा केला होता.

प्रियंका म्हणाली, 'दरवाजा ठोठावल्यानंतर घरातलीच व्यक्ती दरवाजा उघडायला जाते. तेव्हा घरात काम करणाऱ्या बाईने दरवाजा उघडला होता. शाहिद कपूरने दरवाजा उघडला अशी अफवा सगळीकडे पसरवण्यात आली. कोणत्याही मुलीबद्दल असं पसरवणं चुकीचं आहे. ज्या महिला, मुली इथे बसल्या आहेत त्यांना माझ्या भावना नक्कीच समजत असतील. कोणतेही पुरावे नसताना आणि मुळात असं काही घडलेलंच नसताना त्याबाबत तुम्ही चुकीची माहिती कशी देऊ शकता? मी कोणाची तरी मुलगी व बहीण आहे याचं तरी भान राखा.'

गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनीच घेतल्या हातात काठ्या, पहिल्यांदाच घडलं असं काही की...!

प्रियंका पुढे म्हणाली, 'मी आईवडिलांबरोबर राहते. जेव्हा आयकर विभागाचे अधिकारी घरी आले, तेव्हा आई घरी नव्हती. माझ्या आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी ती झारखंडला गेली होती.  तर वडिलांना सकाळी लवकर ऑफिसला जावं लागायचं म्हणून ते दुसऱ्या घरी होते. शाहिद कपूर माझ्या घरापासून फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर राहतो. मी इतर कुणाला फोन केला असता, तर त्यांना यायला २०-२५ मिनिटे लागली असती. म्हणून मी शाहिदला फोन केला. आणि अधिकाऱ्यांनीही त्याला घरात थांबण्याची परवानगी दिली. ही गोष्ट मी कायम मान्य केली आहे.'

शाहीद कपूर आणि प्रियंका चोप्राने 2012 मध्ये आलेल्या 'तेरी मेरी कहानी' या सिनेमात एकत्र काम केले होते. ही सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही मात्र शाहीद प्रियंकाची लव्हस्टोरी इथूनच सुरु झाली.

Web Title: priyanka chopra house IT raid shahid kapoor opened door actress revealed truth behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.