Video : स्टेडिअमवर शाही जोडप्याचं आगमन झालं अन् प्रियंका चोप्रानं डायरेक्ट इग्नोर केलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 03:35 PM2021-07-15T15:35:22+5:302021-07-15T15:37:48+5:30
प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओच्या कमेंट्स तर विचारू नका. सोशल मीडियावर अक्षरश: कमेंट्सचा महापूर आला आहे.
प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओच्या कमेंट्स तर विचारू नका. सोशल मीडियावर अक्षरश: कमेंट्सचा महापूर आला आहे. तर हा व्हिडीओ आहे रविवारी रंगलेल्या महिला विम्बलडन फायनलच्या (Wimbledon Women's Final) रॉयल बॉक्समधला. प्रियंकाही ही फायनल मॅच पाहायला हजर होती. अशात रॉयल बॉक्समध्ये केट मिडलटन (Kate Middleton) व प्रिन्स विल्यम (Prince William) या शाही जोडप्याचं आगमन झालं. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी या शाही जोडप्याचं टाळ्यांच्या कडकडाट करत दमदार स्वागत केलं. पण प्रियंका मात्र तिचा स्कार्फ करताना दिसली. तिनं या शाही जोडप्याकडं फुल्ल इग्नोर मारलं. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगलीये.
it's Priyanka Chopra not applauding to the Prince's arrival for me pic.twitter.com/ZFDvw11F11
— ruru 🌻Free Britney (@selg_simp) July 13, 2021
याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत महिला विम्बलडन फायनल सुरू असलेल्या स्टेडिअममध्ये केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम या शाही जोडप्याची एन्ट्री दिसते. या शाही जोडप्यानं एन्ट्री घेताच प्रत्येकजण टाळ्या वाजवत उत्साहात त्यांचं करताना दिसतो. पण प्रियंका मात्र आपला स्काफ ठीक करताना दिसते.
Love how Priyanka, her friend & Lady in red blazer with her male pal shading Kale&Stale 😂👏🏾 https://t.co/nVs03fKN17
— Meghan Is A Global Queen 👑 (@AmbikQueen) July 13, 2021
She is Megan markle's friend.....
— 𝗡𝗼𝗿𝘁𝗵𝗲𝗿𝗻 𝗟𝗶𝗴𝗵𝘁𝘀𝟮𝟭🇮🇳 (@NLights21) July 13, 2021
The shade. The push back. The revenge.
— IG Bus Acc @pine_arts_gallery (@TooHonestForTh1) July 13, 2021
I love it 🤣🌎🤣⏪ https://t.co/8PD4kl9z7r
सोशल मीडियावर प्रियंकाच्या या वागण्याची चर्चा झाली नसेल तर नवल. काही नेटक-यांच्या मते, प्रियंकाने जाणूनबुजून शाही जोडप्याकडं दुर्लक्ष केलं. काहींच्या मते, प्रियंका मेगनमुळं असं केलं. मेगनंचा बदला तिनं घेतला. काहींनी मात्र कदाचित प्रियंकाचं शाही जोडप्याकडं लक्ष नव्हतं, असं म्हणून तिचा बचाव केला.
ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मार्कल यांनी काही महिन्यांपूर्वी राजघराण्याचा त्याग केला होता. त्यांच्या या निर्णयाची जगभर जबरदस्त चर्चा झाली होती. हा निर्णय जाहिर करताना मेगननं ब्रिटीश राजघराण्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. हीच मेगन प्रियंकाची खास मैत्रिण आहे. याच मेगनमुळं प्रियंकाने शाही जोडप्यासाठी टाळ्या वाजवणं टाळलं, अशी चर्चा सध्या सुरू आहे.