Priyanka Nick Wedding : जाणून घ्या कोण करणार प्रियांका चोप्राचे कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 12:48 PM2018-12-01T12:48:55+5:302018-12-01T12:53:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच निक जोनाससोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. आज डिसेंबरला ख्रिश्चन तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे

Priyanka chopra kanyadan will be done by parineeti chopras parents | Priyanka Nick Wedding : जाणून घ्या कोण करणार प्रियांका चोप्राचे कन्यादान

Priyanka Nick Wedding : जाणून घ्या कोण करणार प्रियांका चोप्राचे कन्यादान

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियांकाच्या लग्नाला काही इंटरनॅशनल स्टार हजेरी लावणार असल्याचीही खबर आहे. लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांना प्रियांका आणि निक एक खास भेट देणार आहेत

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच निक जोनाससोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. आज डिसेंबरला ख्रिश्चन तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे. हिंदू प्रथेमध्ये कन्यादानाला खूप महत्त्व आहे.   


रिपोर्ट्नुसार प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राचे आई वडील रीना आणि पवन चोप्रा कन्यादान करणार आहेत. पवन चोप्रा प्रियांकाच्या बाबांचे लहान भाऊ आहेत. प्रियांकाच्या वडिलांचा 2013मध्ये निधन झाले आहे.   


 प्रियांकाच्या लग्नाला काही इंटरनॅशनल स्टार हजेरी लावणार असल्याचीही खबर आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे वऱ्हाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे. लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांना प्रियांका आणि निक एक खास भेट देणार आहेत. या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक आणि प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल.


 निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय. 

Web Title: Priyanka chopra kanyadan will be done by parineeti chopras parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.