‘ग्लोबल स्टार’ अन् अशी ओळख? प्रियंका चोप्रा दुखावली, जगासमोर व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:33 AM2021-12-17T10:33:27+5:302021-12-17T10:33:47+5:30

Priyanka Chopra Lash Out At A Publication : बॉलिवूडपासून हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा सध्या जाम भडकलीये. होय, अख्ख्या जगासमोर तिनं आपला राग व्यक्त केला आहे.

Priyanka Chopra Lash Out At A Publication For Addressing Her As Wife Of Nick Jonas And Not By Her Own Name | ‘ग्लोबल स्टार’ अन् अशी ओळख? प्रियंका चोप्रा दुखावली, जगासमोर व्यक्त केली नाराजी

‘ग्लोबल स्टार’ अन् अशी ओळख? प्रियंका चोप्रा दुखावली, जगासमोर व्यक्त केली नाराजी

googlenewsNext

बॉलिवूडपासून हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या जाम भडकलीये. होय, अख्ख्या जगासमोर तिनं आपला राग व्यक्त केला आहे. प्रियंकाने मोठ्या मेहनतीनं तिची स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. यासाठी तिनं अपार कष्ट केलेत, सुरूवातीच्या दिवसांत रंगरूपावरून हेटाळणी सहन केली. मोठा संघर्ष केला आणि आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जातेय. पण अशातही तिला नवऱ्याच्या नावानं ओळखलं जात असेल तर हे मोठं ‘दु:ख’ आहे. नेमकं हेच ‘दु:ख’ प्रियंकानं सोशल मीडियावर बोलून दाखवलं आहे.

सध्या तिच्या ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’ या हॉलिवूड चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. याच प्रमोशनचा एक भाग म्हणून चित्रपटाविषयीचा लेख एका वृत्तात छापला गेला होता. मात्र त्यात प्रियंकाचा अभिनेत्री म्हणून उल्लेख न करता ‘निक जोनासची पत्नी’  (Nick Jonas) म्हणून उल्लेख केला गेला. ही गोष्ट प्रियंकाला चांगलीच खटकली.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये संबंधित न्यूजचा स्क्रीनशॉट पोस्ट करत प्रियंकाने राग व्यक्त केला. ‘मी सर्वांत मोठ्या चित्रपटाच्या फ्रँचाइसचं प्रमोशन करतेय आणि तरी माझा उल्लेख निक जोनासची पत्नी असा केला जातोय. प्लीज मला सांगा, आजही महिलांसोबत असं का घडतंय. माझ्या बायोमध्ये मी IMDB लिंक अ‍ॅड करायला हवी का?’, अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये प्रियंकाने पती निक जोनास यालाही टॅग केलं आहे.

अलीकडे प्रियंका व निक यांच्या घटस्फोटाच्या वावड्या उठल्या होत्या. प्रियंकाने सोशल मीडियावर तिच्या नावातून सासरचं आडनाव वगळलं होतं. यावरून निक व प्रियंका यांच्यात बिनसल्याचा अंदाज बांधला गेला होता. मात्र प्रियंकाच्या आईने या सर्व अफवा असल्याचं लगेच स्पष्ट केलं होतं.

‘The Matrix: Resurrections’ हा चित्रपट एचबीओ मॅक्स आणि थिएटर्समध्ये येत्या 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रियांकासोबत केनू रीव्हस, कॅरी-अ‍ॅनी मॉस, जेडा, नील पॅट्रिक हॅरिस, याह्या अब्दुल-मतीन 2  यांच्या भूमिका आहेत.

Read in English

Web Title: Priyanka Chopra Lash Out At A Publication For Addressing Her As Wife Of Nick Jonas And Not By Her Own Name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.