आई झाल्यावर प्रियंका चोप्राने घेतला मोठा निर्णय, हा सिनेमा करण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:09 PM2022-01-25T13:09:24+5:302022-01-25T13:13:00+5:30
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priy anka Chopra)आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनास (Nick Jonas) अलीकडेच सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत.
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priy anka Chopra)आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनास (Nick Jonas) अलीकडेच सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत. 39 वर्षीय प्रियांका आणि 29 वर्षीय निक यांनी 22 जानेवारीच्या मध्यरात्री आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. मात्र या पोस्टमध्ये प्रियांका आणि निक यांना मुलगा झाली की मुलगी याचा खुलासा केला नाही. पण, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, दोघांनी या जगात छोट्या परीचं स्वागत केलं आहे. पहिल्या बाळाच्या आगमनानंतर, आता प्रियांकाला तिचा सर्व वेळ तिच्या बाळाला द्यायचा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने 100 कोटी खर्चून बनत असलेल्या 'जी ले जरा' (Jee Le Zaraa)या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला आहे. तिने या चित्रपटाच्या निर्मात्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याशी बोलून चित्रपटासाठी दुसऱ्या एका अभिनेत्रीला साईन करण्यास सांगितले आहे.
प्रियांका आणि निकचं बाळ प्री-मॅच्युअर बेबी आहे. त्यांच्या बाळाचा जन्म दक्षिण कॅलिफोर्नियातील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. बाळाचा जन्म डिलिव्हरी डेटच्या तारखेपासून 12 आठवडे आधी झाला आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार प्रियंका फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या 'जी ले जरा'मधून बाहेर पडू शकते. ज्यात तिच्यासोबत आलिया भट आणि कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहेत.
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रियंकाला सध्या तिच्या मुलीसोबत राहायचे आहे, त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला आहे. प्रियंकाला तिचा सर्व वेळ आणि एनर्जी तिच्या बाळाला द्यायची आहे. ती आई झाल्यानंतर 'जी ले जरा'चे निर्मातेही थोडे चिंतेत आहेत. रिपोर्टनुसार फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी चित्रपटात प्रियंकाच्या जागी इतर पर्यायांचा शोध घेत आहेत.