प्रियंकाकडे ५ कोटीची कार, १०० कोटींचा बंगला, वार्डरोबमध्ये १३ लाखांचा कोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 02:12 PM2018-08-11T14:12:43+5:302018-08-11T14:12:59+5:30

प्रियंकाची लाइफस्टाइलही तिच्या अफेअरप्रमाणे चर्चेत असते. प्रियंकाकडेही अनेक महागड्या वस्तू आहे.ज्यांची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. 

Priyanka Chopra owns these expensive things | प्रियंकाकडे ५ कोटीची कार, १०० कोटींचा बंगला, वार्डरोबमध्ये १३ लाखांचा कोट

प्रियंकाकडे ५ कोटीची कार, १०० कोटींचा बंगला, वार्डरोबमध्ये १३ लाखांचा कोट

googlenewsNext

मुंबई: बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनस याच्यासोबत असलेल्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे. आज प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्येही आपली जादू चालवत आहे. प्रियंकाची लाइफस्टाइलही तिच्या अफेअरप्रमाणे चर्चेत असते. प्रियंकाकडेही अनेक महागड्या वस्तू आहे.ज्यांची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. 

Harley Davidson ची बाईक

प्रियंकाच्या महागड्या शौकाची सुरुवात तिच्या बाईकने करुयात. प्रियंकाकडे Harley Davidson ची Street 500 ही रेसिंग बाईक आहे. या बाईकची किंमत ४ लाख रुपये इतकी आहे. प्रियंकाने ही बाईक ती 'खतरों के खिलाडी' हा शो होस्ट करत असताना घेतली होती.  

१२ लाखांचा कोट

तशी तर प्रियंकाकडे अनेक महागडे आऊटफिट्स आहेत. पण तिच्या वार्डरोबमध्ये १२.३ लाख रुपये किंमत असलेल्या Fox Fur Coat चा समावेशही आहे. प्रियंकाचा हा कोट डिझायनर Peter Dundas ने डिझाइन केलाय. 

रॉल्स रॉयस घोश्ट कार

प्रियंकाला लक्झरी कार्सचीही खूप आवड आहे. तिच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. पण तिच्या कार कलेक्शनची शोभा वाढवते तिच्याकडे असलेली ५ कोटी रुपये किंमत असलेली  रॉल्स रॉयस ही कार. मोजक्याच कलाकारांकडे ही कार आहे. 

गोव्यातील बंगला

तसे तर प्रियंकाने नुकतेच न्यूयॉर्कमध्ये घर विकत घेतले आहे. पण तिचा गोव्यातही Colonial Bungalow आहे. गोव्यातील बागा बीचजवळ हा बंगला असून याची किंमत २० कोटी रुपये आहे. 

दरीया महल, मुंबई

मुंबईत प्रियंका ज्या बंगल्यात राहते त्या बंगल्याचं नाव दरिया महल आहे. या आलिशान बंगल्याची किंमत १०० कोटी आहे. हा बंगला १९३० मध्ये ब्रिटीश आर्किटेक्टने तयार केला होता. 
 

Web Title: Priyanka Chopra owns these expensive things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.