प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:00 AM2022-12-24T11:00:57+5:302022-12-24T11:29:12+5:30

अनेक वर्षांपूर्वी प्रियंका चोप्राच्या घरी इनकम टॅक्सचा छापा पडला होता. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा शाहिद कपूरने उघडा अशी चर्चा रंगली होती.

Priyanka Chopra reveals about Shahid kapoor presence and income tax raid at her home throwback video viral | प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर

प्रियंका चोप्राच्या घरी Income taxचा छापा पाडला तेव्हा अभिनेत्रीच्या घरी होता शाहिद कपूर? अनेक वर्षानंतर सत्य आले समोर

googlenewsNext

Priyanka Chopra On Income Tax Raid: देसीगर्ल प्रियंका चोप्रा आज ग्लोबल आयकॉन झाली आहे. परदेशातही प्रियंकाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियांकाने लग्न केल्यापासून ती न्युयॉर्कमध्येच स्थायिक झाली आहे. मात्र ग्लोबल स्टार होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. खूप मेहनत घ्यावी लागली. एकवेळ असा होता जेव्हा तिला वाईट दिवसांचा सामना करावा लागला होता. प्रियंका चोप्राच्या घरी इनकम टॅक्सचा छापा पडला होता. त्यावेळी तिच्यासोबत शाहिद कपूरसुद्धा होता. 'कमीने' सिनेमात प्रियंका आणि शाहिद एकत्र दिसले होते, ज्यानंतर दोघांच्या अफेरच्या अफवा उडल्या होत्या.  

आयकर विभागाच्या छाप्याबाबत केला खुलासा
अनेक वर्षानंतर प्रियंका चोप्राने 'आप की अदालत' शोमध्ये याबाबत खुलासा केला होता. " छापा पडला हे सांगायला मला लाज वाटत नाही. आयकर विभाग हा अतिशय जबाबदार विभाग आहे. जर ही बातमी बाहेर आली आहे तर ती खरी आहे". यानंतर रजत शर्मा घराचा दरवाजा कोणी उघडला असे विचारतात. ज्यावर अभिनेत्री म्हणते, "सामान्यत: जो आम्हाला आमच्या घरात मदत करतो तो दरवाजा उघडतो. माझ्या घरी काम करणाऱ्या मेडचं नाव रंजीता आहे". ज्यावर रजत कपूर  म्हणाले, "तुमच्या मेडचा चेहरा शाहिद कपूरसारखा आहे". ज्यावर अभिनेत्री म्हणते, "मला एक  वाटते की ज्या वृत्तपत्रात याबद्दल लिहिले आहे ते आयकर विभागासह माझ्या घरी आले असावे. दरवाजा कोणी उघडला हे त्यांनी पाहिले असेल".
 

या कारणामुळे केला होता शाहिदला फोन 
अभिनेत्री पुढे म्हणते, "आम्ही यावर हसतो आणि विनोद करतो, पण खरं तर ही खूप चीप गोष्ट आहे. इथे उपस्थित असलेल्या मुलींना मला कसं वाटलं हे समजलं असेल. हे चुकीचे आहे, तुमच्याकडे ना पुरावा आहे आणि ना असे कधी घडले आहे. तुम्ही काही बिनबुडाच्या अफवांवर पहिल्या पानावर बातम्या आणि हेडलाईन टिकर बनवता, तुम्ही एका मुलीबद्दल बोलत आहात जी तिच्या पालकांसोबत राहते हे पूर्णपणे विसरून जातो. मी सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची बहीण आहे." यादरम्यान प्रियांकाने सांगितले की, शाहिद कपूर हा तिचा शेजारी होता, जो तिच्या घरापासून 3 मिनिटांच्या अंतरावर राहत होता. छापा टाकला तेव्हा तिचे आई-वडील घरी नव्हते आणि कोणालाही घरापर्यंत पोहोचायला २० ते २५ मिनिटे लागणार होती, म्हणून मी त्याच्या जवळ राहणाऱ्या शाहिदला फोन केला.

Web Title: Priyanka Chopra reveals about Shahid kapoor presence and income tax raid at her home throwback video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.