Priyanka Chopra: प्रियांका चोप्रानं मुंबईतील दोन घरं विकली!, ऑफिसही भाड्यानं दिलं; इतक्या कोटींना झाली डील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 07:58 PM2021-07-23T19:58:56+5:302021-07-23T20:06:21+5:30

Priyanka Chopra : बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं नुकतंच मुंबईतील तिची दोन राहती आलिशान घरं विकल्याची माहिती समोर आली आहे.

Priyanka Chopra Sells Two Mumbai Apartments for Rs 7 Crore Report | Priyanka Chopra: प्रियांका चोप्रानं मुंबईतील दोन घरं विकली!, ऑफिसही भाड्यानं दिलं; इतक्या कोटींना झाली डील

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रानं मुंबईतील दोन घरं विकली!, ऑफिसही भाड्यानं दिलं; इतक्या कोटींना झाली डील

googlenewsNext

Priyanka Chopra : बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं नुकतंच मुंबईतील तिची दोन राहती आलिशान घरं विकल्याची माहिती समोर आली आहे. मनी कंट्रोल या वेबसाइटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रियांकनं नुकतंच न्यूयॉर्कमध्ये 'सोना' नावाचं भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणारं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. याशिवाय तिनं एक हेअर केअर ब्रँड देखील सुरू केला आहे. तसंच तिनं लिहिलेलं 'अनफिनिश्ड' नावाचं पुस्तक देखीस प्रसिद्ध झालं आहे. (Priyanka Chopra Sells Two Mumbai Apartments for Rs 7 Crore: Report)

दरम्यान, प्रियांकानं तिच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये बरेच उतारचढाव पाहायला मिळाले आहेत. प्रियांकाची सध्या न्यूयॉर्क, मुंबई आणि इतर शहरांमध्ये घरं आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार तिनं आता मुंबईतील तिचे दोन आलिशान फ्लॅट विकले आहेत. तर एक कार्यालय भाड्यानं द्यायचा निर्णय घेतला आहे. 

प्रियांकानं विक्रीस काढलेले दोन्ही फ्लॅट अंधेरी येथील राज क्लासिक या इमारतीतील आहेत. "अंधेरीतील राज क्लासिक इमारतीतील ७ व्या मजल्यावरील ८८८ स्वेअर फुटांचा फ्लॅट ३ कोटी रुपयांना विकला असून यासाठीची ९ लाखाची स्टॅम्प ड्युटी देखील भरण्यात आली आहे. यासोबत याच इमारतीतील १२१९ स्वेअर फुटांचा फ्लॅट ४ कोटी रुपयांना विकला आहे. यासाठी १२ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे", अशी माहिती एका अहवालात छापण्यात आली आहे. 

प्रियांकानं तिचं मुंबईतील एक कार्यालय देखील भाड्यानं द्यायचा निर्णय घेतला आहे. यासाठी दरमहा २.११ लाख रुपये भाड्याची डील करण्यात आली आहे. गेल्या वर्षी प्रियांकानं अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरही २ कोटी रुपयांना विकलं होतं. 

Web Title: Priyanka Chopra Sells Two Mumbai Apartments for Rs 7 Crore Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.