PHOTO : आई, आज्जी आणि मालती एकाच फ्रेममध्ये, प्रियंका चोप्राने दाखवली लेकीची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:11 AM2022-06-17T11:11:28+5:302022-06-17T11:12:29+5:30

Priyanka Chopra Daughter Malti Photo: एका फ्रेममध्ये दिसल्या तीन पिढ्या... प्रियंका चोप्राने आईच्या बर्थडेला शेअर केला Unseen Photo,

Priyanka Chopra shares rare photo of her daughter Malti Marie | PHOTO : आई, आज्जी आणि मालती एकाच फ्रेममध्ये, प्रियंका चोप्राने दाखवली लेकीची झलक

PHOTO : आई, आज्जी आणि मालती एकाच फ्रेममध्ये, प्रियंका चोप्राने दाखवली लेकीची झलक

googlenewsNext

Priyanka Chopra Daughter Malti  Marie Photo: ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मातृत्व एन्जॉय करतेय. गेल्या जानेवारीत प्रियंका आई बनली. सरोगसीद्वारे तिने मुलीला जन्म दिला. प्रियंका व तिचा पती निक जोनास यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली होती. प्रियंका आई झाल्यापासून चाहते तिच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आतूर आहेत. पण अद्यापही प्रियंकाने लेकी  मालतीचा चेहरा दाखवलेला नाही. मात्र आता तिने मुलीची झलक दाखवली आहे.

आई मधु चोप्रा हिला वाढदिवसाच्या (Madhu Chopra Birthday) शुभेच्छा देत प्रियंकाने लेकीची झलक दाखवणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका, तिची आई आणि लेक मधु अशा तिघी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. आज्जीनं मोठ्या लाडानं नातीला हातात धरलं आहे आणि प्रियंका लेकीकडे कौतुकानं बघत आहे, असा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तीन पिढ्या एकत्र असलेला हा फोटो शेअर करत प्रियंकाने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्या या सकारात्मक हास्यासह  सदैव अशीच हसत राहा. तू मला  खूप प्रेरणा देतेस. तुझी सोलो युरोप ट्रिप हे तुझ्या वाढदिवसाचं सर्वात चांगलं सेलिब्रेशन होतं. खूप सारं प्रेम आजी,’ असं प्रियंकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 प्रियंका आणि निक जानेवारीत सरोगसीद्वारे आपल्या मुलीचं स्वागत केलं. मालतीचा जन्म वेळेआधी झाल्यामुळे तिला घरी आणण्यापूर्वी 100 दिवस रूग्णालयात एनआयसीयूमध्ये ठेवावं लागलं होतं.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या हॉलिवूड वेबसीरीजमध्ये बिझी आहे. ती लवकरच फरहान अख्तरच्या  ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्टसुद्धा असणार आहेत. हा चित्रपट एक रोड ट्रिपवर आधारित असणार आहे.

 
 

Web Title: Priyanka Chopra shares rare photo of her daughter Malti Marie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.