प्रियंका चोप्राच्या जाऊबाईंचा संसार मोडणार, घटस्फोटासाठी दिराने दाखल केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:54 PM2023-09-06T12:54:09+5:302023-09-06T12:56:48+5:30

त्यांच्या घटस्फोटासाठी बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

Priyanka chopra sister and brother in law joe jonas sophie turner headed divorce after 4 years marriage report | प्रियंका चोप्राच्या जाऊबाईंचा संसार मोडणार, घटस्फोटासाठी दिराने दाखल केला अर्ज

प्रियंका चोप्राच्या जाऊबाईंचा संसार मोडणार, घटस्फोटासाठी दिराने दाखल केला अर्ज

googlenewsNext

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबात घडणाऱ्या घडामोडींमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंकाच्या जाऊबाई आणि दीरामध्ये सारे काही अलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोफी टर्नर ( sophie turner) आणि पॉप सिंगर जो जोनास (Joe jonas) ही जोडी लवकरच विभक्त होणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, जो जोनासने पत्नी सोफी टर्नरनेपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. सोफी आणि जो जोनास यांनी २०१९ मध्ये लास वेगासमध्ये गपचूप लग्नगाठ बांधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, लग्नाच्या ४ वर्षांमध्येच ते विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

रिपोर्टनुसार, सोफी आणि जो यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून मतभेद सुरु आहेत. त्यामुळे ते लॉस एंजेलिसमधील एका वकिलाशी सल्लामसलतही करत आहेत. परंतु, या वृत्ताविषयी जोनास कुटुंबीय आणि प्रियांका यांनी अद्याप कोणतही भाष्य केलं नाही. 

दरम्यान, जो आणि सोफी यांनी त्यांचं मियामीमधील घरदेखील विकलं आहे. जो आणि सोफी ही जोडी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. तर, २०१९ मध्ये लग्न केलं. त्याचसोबत या जोडीला दोन मुलंदेखील आहेत. जो हा निक जोनास याचा मोठा भाऊ आहे. 

Web Title: Priyanka chopra sister and brother in law joe jonas sophie turner headed divorce after 4 years marriage report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.