Priyanka Nick Wedding: प्रियांकाच्या लग्नाला जोधपूरला पोहोचली सलमान खानची बहीण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 03:35 PM2018-11-30T15:35:17+5:302018-11-30T15:39:31+5:30
प्रियांका व निकच्या लग्नात बॉलिवूडच्या कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवण्यात आलेले नाही. अपवाद फक्त सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा.
काल प्रियांका चोप्राच्या हातावर निक जोनासच्या नावाची मेहंदी सजली. यानंतर आज दोघांच्या लग्नाची संगीत सेरेमनी रंगणार आहे. जोधपूरच्या उमेद भवना या शाही पॅलेसमध्ये येत्या २ डिसेंबरला प्रियांका व निक दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. प्रियांका व निक या दोघांचेही कुटुंबीय या लग्नासाठी जोधपूरला पोहोचले आहेत. काही इंटरनॅशनल सेलिब्रिटीही लग्नाला पोहोचल्याची खबर आहे. या लग्नात बॉलिवूडच्या कुठल्याही सेलिब्रिटीला बोलवण्यात आलेले नाही. अपवाद फक्त सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा. होय, सलमानची बहीण अर्पिता खान प्रियांकाच्या लग्नासाठी जोधपूरला पोहोचली आहे.
आज सकाळी अर्पिता मुलगा अहिलसोबत जोधपूर विमानतळावर स्पॉट झाली. अर्पितासोबत तिचा पती आयुष शर्मा नव्हता.
अर्पिताशिवाय बॉलिवूडचे सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर सब्यसाचीही जोधपूरला पोहोचले आहेत. सब्यसाची जोधपूरला पोहोचल्यामुळे आपल्या लग्नात प्रियांकाही दीपिका पादुकोणप्रमाणे सब्यसाची यांनी डिझाईन केलेला ड्रेस घालेल, असे मानले जात आहेत.
अर्पिता खान व प्रियांका दोघेही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अर्पिताच्या म्हणण्यावरूनचं सलमानच्या ‘भारत’ या चित्रपटात प्रियांकाची वर्णी लागली होती. अर्थात ऐनवेळी प्रियांकाने हा चित्रपट सोडला होता. प्रियांकाने चित्रपटातून अंग काढून घेतल्यामुळे सलमान तिच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावेळीही प्रियांकाने अर्पिताच्या माध्यमातून भाईजानची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले होते.
प्रियांका व निकच्या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन अगदी नववधूप्रमाणे नटलेआहे. अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे. उमेद भवनाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
प्रियांका व निकच्या लग्नाचा मंडपही सजला आहे. अगदी शाही पद्धतीने तो सजवण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रियांका व निक हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे.
प्रियांका व निकच्या लग्नामुळे उमेद भवन सामान्यजनांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आले आहे.