निर्मिती सावंत पुन्हा रंगमंचावर
By Admin | Published: July 20, 2015 02:10 AM2015-07-20T02:10:02+5:302015-07-20T02:10:02+5:30
निर्मिती सावंत काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत रमल्या होत्या; त्यामुळे रंगभूमीवर फारशा दिसत नव्हत्या. मात्र, दीर्घ कालावधीनंतर ‘श्री बाई समर्थ’ नाटकात त्या दिसणार आहेत
निर्मिती सावंत काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत रमल्या होत्या; त्यामुळे रंगभूमीवर फारशा दिसत नव्हत्या. मात्र, दीर्घ कालावधीनंतर ‘श्री बाई समर्थ’ नाटकात त्या दिसणार आहेत. ‘सासू नंबरी, जावई दस नंबरी’, ‘हप्ता बंद’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हॉर्न ओके प्लीज’, ‘आयडियाची कल्पना’, ‘चल धरपकड’, ‘अय्या’, ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’ या चित्रपटांतून निर्मिती सावंत यांनी वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केली. मात्र, मुळात त्या नाटकातच रमतात. ‘जाऊ बाई जोरात’, ‘श्यामची मम्मी’, ‘कुमारी गंगूबाई मॅट्रिक’, ‘बंटी की बबली’ यासारखी नाटके जोरात सुरू होती. त्यांनी स्वत:चा ब्रॅँड निर्माण केला असून, या नव्या नाटकात सर्वसामान्य गृहिणीच्या बंडाची कथा मांडण्यात आली आहे. पुरुषी अहंकार या गृहिणीला अस्वस्थ करीत असतो. आपल्या कष्टाचे, कामाचे कौतुक व्हावे, सन्मान मिळावा, अशी तिची अपेक्षा असते. या नाटकात निर्मिती सावंत यांच्यासह अभिनेते अरुण नलावडे, समीर चौघुले, मनमीत पेम, वनिता खरात यांच्या प्रमुख भूमिका आहेत.