नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले स्मृतिदिन

By Admin | Published: September 12, 2016 10:15 AM2016-09-12T10:15:21+5:302016-09-12T10:29:58+5:30

नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले यांचा आज (१२ सप्टेंबर) स्मृतिदिन

Prominent Marathi actors, playwright Suresh Chikhale Memorial Day | नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले स्मृतिदिन

नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले स्मृतिदिन

googlenewsNext
>- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १२ - नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले यांचा आज (१२ सप्टेंबर) स्मृतिदिन. 
चिखले यांनी इंडियन नॅशनल थिएटर अर्थात आयएनटीमधून लेखनाची तालीम घेतली होती. त्यांनी विविध आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून लेखन आणि अभिनय केला होता. कॉ. कृष्णा देसाई खून खटल्यावर आधारित त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेला आयएनटीच्या स्पर्धेत लेखन आणि दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले होते तरगुरू नावाच्या एकांकिकेसाठी त्यांना अभिनयाचेही पारितोषिक मिळाले होते. आएनटीच्या ती फुलराणी, कोंडीया नाटकात चिखले यांनी अभिनय केला होता. आयएनटीच्या लोककला संशोधन केंद्रासाठीही त्यांनी काही काळ काम केले होते.
 
जवळपास चाळीस वर्षापासून मराठी रंगभूमीवर अनेक वैविध्यपूर्ण विषय त्यांनी हाताळले. ‘जांभूळ आख्यान’सारखं लोकनाट्य असो, किंवा संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक शंभूराजे असो, वेश्यांच्या आयुष्यावरील गोलपिठासारखं नाटक असेल, अशा वैविध्यपूर्ण आणि आजवर स्पर्श न केलेल्या विषयांवर सुरेश चिखले यांनी नाट्यलेखन केले. गोलपीठा, अकस्मात, जांभूळ आख्यान, प्रेम पुजारी, खंडोबाचं लगीन, सध्या गाजत असलेलं प्रपोजल ही त्यांची नाटकंसुद्धा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही उचलून धरली होती.
 
नाटके
अकस्मातकोंडी (अभिनय)
खंडोबाचं लगीन (लेखन)
गच्च भरलेलं आभाळ
गुरू (अभिनय)
गोलपिठा (लेखन) - वेश्यांच्या जीवनावर चिखले यांनी लिहिलेल्या गोलपिठा नाटकाला मुंबईत काही नाटय़गृहात प्रयोग करण्यास बंदी होती. ही बंदी उठविली जावी, त्यासाठी काही मान्यवर साहित्यिकांसाठी या नाटकाचा खास प्रयोग त्यावेळी सादर करण्यात आला. त्यांच्या सहमतीने ही बंदी उठवली गेली. पुढे राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेत या नाटकाला सवरेत्कृष्ट नाटकाचा पहिला पुरस्कारही मिळाला.(लोकमहाभारत अर्थात्‌) 
जांभूळ आख्यान (लेखन)
ती फुलराणी (अभिनय)
प्रपोजल (लेखन)
शंभूराजे (लेखन) या नाटकाचे साडेतीनशेच्या आसपास प्रयोग झाले.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया व ईंटरनेट 

Web Title: Prominent Marathi actors, playwright Suresh Chikhale Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.