Propose Day Special: निकने मध्यरात्री 12 च्या ठोक्याची वाट पाहिली, अभिषेकने नकली हिऱ्याची अंगठी निवडली..!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:51 PM2022-02-08T16:51:40+5:302022-02-08T16:53:06+5:30

Valentine Week Propose Day Special: सेलिब्रिटींच्या प्रपोजचे इंटरेस्टिंग किस्से..., सेलिब्रिटींनी रिअल लाइफमध्ये त्यांच्या पार्टनरला कशाप्रकारे आणि कुठे प्रपोज केलं?

propose day special shahrukh khan saif ali khan these celebs had expressed their love | Propose Day Special: निकने मध्यरात्री 12 च्या ठोक्याची वाट पाहिली, अभिषेकने नकली हिऱ्याची अंगठी निवडली..!!

Propose Day Special: निकने मध्यरात्री 12 च्या ठोक्याची वाट पाहिली, अभिषेकने नकली हिऱ्याची अंगठी निवडली..!!

googlenewsNext

Propose Day Special: आज व्हॅलेन्टाईन वीकचा (Valentine Week) दुसरा दिवस. म्हणजे काय तर प्रपोज डे. तुम्हीही तुमच्या प्रियकर वा प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी या दिवसाची वाट बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, शाहरूखपासून मुकेश अंबानींपर्यंत आपल्या प्रेमाला कसं प्रपोज केलं, याचे धम्माल किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शाहरूख खान व गौरी खान यांची लव्हस्टोरी अख्ख्या जगाला ठाऊक आहे. गौरीच्या प्रेमात शाहरूख इतका पझेसिव्ह झाला होता की, कधी कधी तिला वैताग यायचा. शाहरूख व गौरीची लव्हस्टोरी सुरू झाली होती ती दिल्लीत. लव्ह स्टोरी नवी नवीन सुरू झाली असतानाच गौरी अचानक शाहरूखला काहीही न सांगता मुंबईला निघून गेली. मग काय, तिला शोधत शोधत शाहरूखही मुंबईत पोहोचला. यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. एक दिवस शाहरूख गौरीला घरी सोडायला गेला. ती गाडीतून उतरत असतानाच मी तुझ्याशी लग्न करणार, अशा शब्दांत शाहरूखने गौरीला प्रपोज केलं. आश्चर्य म्हणजे, गौरीच्या उत्तराची वाट न बघता तो लगेच यानंतर निघून गेला. मुश्ताक शेख यांनी शाहरूखच्या बायोग्राफीमध्ये   किस्सा लिहिलेला आहे.

अभिषेक ऐश्वर्याच्या प्रपोजलचा किस्सा तर फारच इंट्रेस्टिंग  आहे. सगळ्यांना वाटतं की अभिषेक ऐश्वयाचं अ‍ॅरेंज मॅरेज आहे. पण तसं नाहीय. त्यांचं लव्ह मॅरेज आहे. अभिषेकने 2007 साली न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला प्रपोज केलं. नकली हिऱ्याची अंगठी घालून अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं आणि ऐशने लगेच होकार दिला होता.  

‘अलोन’ या सिनेमावेळी करण सिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांची ओळख झाली होती. यानंतर दोघं प्रेमात पडले. दोघेही कोह समुईमध्ये एकत्र होते. ती रात्र ३१ डिसेंबरची होती. करण सोबत रिंग घेऊन आला आणि त्याने अचानक बिपाशाला रिंग देत तिला प्रपोज केलं होतं. करणने असं अचानक प्रपोज केलेलं बघून बिपाशाला काय बोलावं कळेना. पण लगेच स्वत:ला सावरत तिने लग्नाला होकार दिला होता.

 सैफ अली खान आणि करिना कपूर यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहीत आहे. सैफने कसं प्रपोज केलं हे करिनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रेमात पडल्यानंत काही महिन्यांनीच सैफने बेबोला पॅरीसमध्ये प्रपोज केलं होतं. दोघं एका हॉटेलमध्ये होते. पण आश्चर्य म्हणजे, त्या दिवशी करिनाने सैफला चक्क नकार दिला होता. पण हार मानेल तो सैफ नाही. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा प्रपोज केलं. त्यावेळी करिना व सैफ  एका चर्चमध्ये होते. यावेळी करिनाने विचार करायला वेळ मागितला आणि सरतेशेवटी दोन दिवसांन्नंतर त्याला होकार कळवला. 

अमेरिकन सिंगर निक जोनास याने  प्रियंकाच्या बर्थडेच्या पुढच्या दिवशी तिला प्रपोज केलं होतं. निकने प्रियंकाचा बर्थडे संपेपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत वाट पाहिली होती. प्रियंकाचा बर्थडे आणि एंगेजमेंट अ‍ॅनिव्हर्सरी एकत्र येऊ नये, हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर निकने गुडघ्यावर बसून प्रियंकाला प्रपोज केलं होतं. तू माझ्याशी लग्न करुन जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होशील का? अशा शब्दांत त्याने तिला प्रपोज केलं होतं. यावर 45 सेकंद प्रियंका काहीच बोलली नाही. पण नंतर तिने होकार दिला.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या प्रपोजलचा किस्सा चांगलाच फिल्मी आहे.  मुकेश यांनी निता यांना अगदी फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं. होय, एकेदिवशी ते नीता यांना एका डेटवर घेऊन गेले आणि मग रस्त्यावर अचानक ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबवून त्यांनी नीता यांना प्रपोज केलं होतं. तू उत्तर देत नाही तोपर्यंत एकही कार पुढे जाऊ देणार नाही, असं म्हणत फिल्मी स्टाईलने मुकेश यांनी नीता यांना प्रपोज केलं होतं. 

Web Title: propose day special shahrukh khan saif ali khan these celebs had expressed their love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.