'पुष्‍पा'चा दिग्दर्शक सुकुमारच्या सिनेमात झळकणार राम चरण, पोस्टरचा फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:04 PM2024-03-26T18:04:49+5:302024-03-26T18:05:25+5:30

'पुष्पा' चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमारने आता राम चरणसोबत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही

'Pushpa' director Ram Charan will be seen in Sukumar's film, the first look of the poster is out | 'पुष्‍पा'चा दिग्दर्शक सुकुमारच्या सिनेमात झळकणार राम चरण, पोस्टरचा फर्स्ट लूक आला समोर

'पुष्‍पा'चा दिग्दर्शक सुकुमारच्या सिनेमात झळकणार राम चरण, पोस्टरचा फर्स्ट लूक आला समोर

अभिनेता राम चरणसाठी २०२४ हे वर्ष खूप दमदार असणार आहे. RRR च्या बंपर यशानंतर, राम चरणने अलीकडेच त्याच्या नवीन चित्रपट RC16 च्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली होती, आता होळीच्या निमित्ताने त्याने चाहत्यांना नवीन आनंदाची बातमी दिली आहे. अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा' चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुकुमारने आता राम चरणसोबत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, मात्र RC17 चे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.

एसएस राजामौलींसोबतच्या 'आरआरआर' चित्रपटातील उत्तम यशानंतर सुकुमारचा हा चित्रपट राम चरणसाठी मैलाचा दगड ठरू शकतो, असे सिनेतज्ज्ञांचे मत आहे. होळीच्या शुभ मुहूर्तावर, राम चरणने त्याच्या चाहत्यांना त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल इंस्टाग्रामवर अपडेट दिली आहे. राम चरण आणि सुकुमार यांनी यापूर्वी 'रंगस्थलम'मध्ये एकत्र काम केले आहे.

राम चरणने RC17चा फर्स्ट लूक पोस्टर केला शेअर
राम चरणने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तो सुकुमारसोबत दिसत आहे, तर दुसरा फोटो आरसी१७ चे फर्स्ट लूक पोस्टर आहे. राम चरण आणि सुकुमार यांच्यासोबत, RC17 मध्ये देवी श्री प्रसाद (DSP) यांचे संगीत देखील असेल. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'रंगस्थलम'मध्येही हे तिघे एकत्र होते. RC17 ची निर्मिती 'Mythory Movies' च्या बॅनरखाली होत आहे. या चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांचीही लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

पुढील वर्षी २०२५ मध्ये हा चित्रपट होणार प्रदर्शित
असे सांगितले जात आहे की RC17 ची शूटिंग या वर्षी सुरू होईल, तर पुढील वर्षी २०२५ च्या शेवटच्या तिमाहीत संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल. राम चरण 'मगधीरा', 'येवडू', 'ध्रुव', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' सारख्या सुपरहिट तेलुगू चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचा शेवटचा चित्रपट RRR होता. ज्याने 'नाटू नाटू' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअरसाठी ऑस्कर देखील जिंकला होता.

Web Title: 'Pushpa' director Ram Charan will be seen in Sukumar's film, the first look of the poster is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.