'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:15 PM2024-11-28T16:15:41+5:302024-11-28T16:16:35+5:30

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आई झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत

Pyaar Ka Punchnama actress actress Sonnalli Seygall and her husband welcomed their baby girl | 'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' या सिनेमांमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री सोनाली सहगल आई झालीय. सोनालीने मुलीला जन्म दिला असून लग्नानंतर दीड वर्षांनी सोनाली आई झालीय. सोनाली आणि तिचे पती आशिष सजनानी आई-बाबा झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी सांताक्रूझ येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये सोनालीने मुलीला जन्म दिला असं सांगण्यात येतंय. सोनाली आणि तिची मुलगी दोघीही स्वस्थ आहेत.

लग्नानंतर दीड वर्षांनी सोनाली झाली आई?

मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री सोनाली आणि तिचा पती आशिष दोघेही आनंदात आहेत. लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात छोट्या पाहुणीचं आगमन झाल्याने दोघेही खूश आहेत. सोनाली आणि आशिष मुलीची झलक कधी दाखवणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान सोनालीच्या चाहत्यांनी आई अन् मुलगी झाल्याबद्दल कमेंट्सच्या माध्यमातून सोनाली आणि आशिषचं अभिनंदन केलंय.


गरोदर असतानाही सोनाली सक्रीय

गरोदर असतानाही सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय होती. सोनालीने हटके मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले केले होते. घरातील पाळीव कुत्र्याबरोबर सोनालीने केलेलं मॅटर्निटी फोटोशूट लोकांच्या पसंतीस उतरलं होतं. यामध्ये तिने बिकिनी ड्रेस परिधान केला होता.  ७ जून २०२३ रोजी सोनाली बिझनेसमन आशिष सजनानीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यापूर्वी कपल पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

 

Web Title: Pyaar Ka Punchnama actress actress Sonnalli Seygall and her husband welcomed their baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.