Chetan Bhagar, R. Madhavan : "होय, 3 Idiots पुस्तकापेक्षा चांगला चित्रपट;" आर. माधवननं घेतली चेतन भगतची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 08:13 AM2021-12-21T08:13:00+5:302021-12-21T08:13:26+5:30
Chetan Bhagar, R. Madhavan : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट 3 Idiots हा चेतन भगत याच्या एका कादंबरीवर आधारित होता, असं म्हटलं जातं.
बॉलीवूडमधील काही सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर आमिर खान (Amir Khan), आर माधवन (R. Madhavan), बोमन इराणी (Boman Irani) आणि शर्मन जोशी (Sharman) यांच्या प्रमुख भूमिका असलेला '3 इडियट्स' या चित्रपटाचं नाव नक्कीच घेतलं जाईल. हा चित्रपट इतका लोकप्रिय आहे की तो टीव्हीवर दिसत असला तरी लोक पुन्हा त्याचा आनंद घेतात. हा चित्रपट चेतन भगतच्या '5 पॉइंट समवन' या कादंबरीवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. आता याच मुद्द्यावरून अभिनेता आर माधवनने सोशल मीडियावर (Social Media) लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) याची फिरकी घेतली आहे.
चेतन भगत हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. अनेकदा तो आपले विचार आणि मतही व्यक्त करताना दिसतो. "कोणता चित्रपट कधी एखाद्या कादंबरीपेक्षा चांगला आहे असं तुम्ही ऐकलंय का?," असा प्रश्न त्यानं ट्विटरवर केला होता. यावर आर माधवन यानं त्याची फिरकी घेत "होय, 3 इडियट्स" असं उत्तर दिलं.
YES! 3 Idiots🤩🤩🤣🤣🙏 https://t.co/gciVNcobiA
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) December 20, 2021
आर. माधवनच्या या ट्वीटनंतर अनेक नेटकऱ्यांनीही चेतन भगतची फिरकी घेण्यास सुरूवात केली. "3 इडियट्स, हाफ गर्लफ्रेन्ड, 2 स्टेट्स... सर्वच चित्रपट कादबरींपेक्षा चांगले होते," असं एका युझरनं लिहिलं. तर एकानं हे चित्रपट इतके चांगले होते की या भयानक पुस्तकांबाबत माहिती मिळाली, असं म्हटलं.
HAHAHAHAHA, what an unsubtle plug, maybe it’s just me, I prefer a Pulitzer over a pan masala branded award show. https://t.co/fdJb7RZBuF— Chetan Bhagat (@chetan_bhagat) December 20, 2021
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 3 इडियट्स हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, बमन इराणी, शरमन जोशी, करीना कपूर खान, मोना सिंह मुख्य भूमिकांमध्ये होते.