लॉकडाउनचा कालावधी लंडनमध्ये व्यतित करून भारतात परतली राधिका आपटे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 11:13 AM2021-02-04T11:13:01+5:302021-02-04T11:13:29+5:30

लॉकडाउनमध्ये राधिका आपटे लंडनमध्ये होती. त्यानंतर आता ती भारतात परतली आहे.

Radhika Apte returned to India after spending the lockdown in London | लॉकडाउनचा कालावधी लंडनमध्ये व्यतित करून भारतात परतली राधिका आपटे

लॉकडाउनचा कालावधी लंडनमध्ये व्यतित करून भारतात परतली राधिका आपटे

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून अभिनेत्री राधिका आपटे लंडनमध्ये होती. त्यानंतर आता ती भारतात परतली आहे. मात्र आई वडिलांना भेटण्यापूर्वी तिला काही दिवस हॉटेलमध्ये राहून क्वारंटाइन राहावे लागणार आहे. भारतात राधिका नवीन चित्रपटाचे शूटिंग करणार आहे.

लंडनमध्ये जवळपास १० महिने राहिल्यानंतर राधिका आपटे भारतात परतली आहे. मात्र तिला पुण्यात राहणाऱ्या तिच्या आई वडिलांना भेटण्यास मनाई आहे. दोघेही वयस्कर आहेत आणि लंडनहून मुलीच्या प्रवासादरम्यान सातत्याने व्हिडीओ कॉलवर तिच्यासोबत संपर्कात होते.


परदेशातून परतल्यानंतर राधिका सध्या हॉटेलमध्ये अडकली आहे. कोराना काळातील सुरक्षा नियमावलीनुसार, परदेशातून महाराष्ट्रात आलेल्या लोकांना क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक आहे. विशेष करून ब्रिटेनमध्ये नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमुळे क्वारंटाइन प्रक्रिया सक्त करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की राधिका  आपटे क्वारंटाइनचा काळ पूर्ण केल्यानंतर आपल्या आई वडिलांना भेटू शकते.

क्वारंटाइमचा पूर्ण वेळ राधिकाने हॉटेलमध्ये व्यतित करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेत नवीन स्क्रीप्ट्स वाचणे आणि लोकांसोबत फोनवर बोलण्यासाठी वापरते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधिकाचा भारतात परतण्याचा हेतू आई वडिलांना भेटणे हा आहे. तसेच इथे एका नवीन चित्रपटाचे शूटिंगदेखील करणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी बनणाऱ्या या चित्रपटाचे नाव अंडरकवर असल्याचे सांगितले जात आहे.


राधिका आपटे शेवटची रात अकेली है आणि ए कॉल टू स्पाइ या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतूक झाले. 

Web Title: Radhika Apte returned to India after spending the lockdown in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.