Radhika Apte : आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 01:39 PM2022-07-10T13:39:27+5:302022-07-10T13:39:51+5:30

Radhika Apte on her Wedding : 2012 साली राधिकाने लंडनमध्ये स्थायिक  व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं. याच लग्नाबद्दलचा एक शॉकिंग खुलासा राधिकाने केला आहे...

Radhika Apte reveals she has no photos from her wedding with Benedict Taylor | Radhika Apte : आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल

Radhika Apte : आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल

googlenewsNext

Radhika Apte on her Wedding : बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या फिल्मी करिअरमध्ये राधिकाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. राधिकाच्या फिल्मी करिअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तिच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. राधिका विवाहित आहे. पण आश्चर्य म्हणजे, राधिकाच्यिा सोशल मीडिया अकाऊंटवरवर तिच्या लग्नाचा एकही फोटो नाहीये. असं का? तर याचाही खुलासा झाला आहे. खुद्द राधिकाने एका मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं.

2012 साली राधिकाने लंडनमध्ये स्थायिक  व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत ( Benedict Taylor) लग्न केलं. राधिका व बेनेडिक्ट 2011 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. डान्स शिकण्यासाठी राधिका लंडमध्ये गेली होती. इथेच त्यांची ओळख झाली आणि लवकरच राधिका व बेनेडिक्ट एकत्र राहू लागले. 2012 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा छोटाशा विवाह सोहळा पार पडला होता. पण या लग्नाचा एकही फोटो राधिकाकडे नाही. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने यामागचं कारण स्पष्ट केलं.

फोटो क्लिक करणार कोण?
राधिकाने सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी माझं व बेनेडिक्टचं लग्न झालं, त्यावेळी आम्ही फोटो क्लिक करायलाच विसरलो. आम्ही आमच्या जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित लग्न केलं होतं. लग्नात अगदी मोजकी माणसं होती. आम्ही स्वत:चं जेवण बनवलं होतं. इंग्लंडमधील एका ठिकाणी आम्ही लग्न केलं. तिथेच पार्टी केली. इतकं सगळं झालं पण आम्ही फोटो काही काढले नाही. लग्नात हजर आमचे अर्धे अधिक मित्र उत्तम फोटोग्राफर होते. तरीही त्यांनी आमचे फोटो काढले नाहीत. आम्ही सुद्धा फोटो काढा, असं त्यांना म्हटलं नाही. कारण आम्ही सगळेच नशेत होतो. मग फोटो काढणार कोण?  म्हणून माझ्या लग्नाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण हे एका अर्थी चांगलं देखील आहे. माझ्या नवऱ्याला  फोटो काढण्यामध्ये रसच नाही. हळूहळू त्याच्यात थोडी सुधारणा होतो. आत्ता कुठे आम्ही फिरायला जातो तेव्हा फोटोसाठी तो पोझ देतो. 

राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, अलीकडे झी5 वर रिलीज ‘फोरेन्सिक’मध्ये राधिका दिसली होती. यात तिने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. लवकरच राधिका ‘विक्रम वेधा’ या सिनेमात झळकणार आहे. यात हृतिक रोशन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

 

Web Title: Radhika Apte reveals she has no photos from her wedding with Benedict Taylor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.