राधिका आपटे म्हणते, नेपोटिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:10 PM2019-04-17T20:10:00+5:302019-04-17T20:10:00+5:30

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड अंदाज व विविध मुद्यांवरील भाष्यामुळे चर्चेत असते.

Radhika Apte says, I have no problem with nepotism | राधिका आपटे म्हणते, नेपोटिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही

राधिका आपटे म्हणते, नेपोटिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड अंदाज व विविध मुद्यांवरील भाष्यामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने मुंबई मिररशी बोलताना बॉलिवूडमधील नेपोटिझम व पे गॅपवर आपले मत मांडले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की,'मला आऊटसाइडर शब्द अजिबात आवडत नाही. जर मी एक दिग्दर्शिका आहे आणि माझ्या मुलाला अभिनेता बनायचा आहे तर मी त्याला का लाँच करू?'


राधिकाने मुंबई मिररशी बोलताना सांगितले की,  'नेपोटिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आजकाल बॉलिवूडमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एकीकडे रणवीर सिंग, दीपिका पादुकोण व कंगना रानौतसारखे कलाकार आहेत ज्यांना बॉलिवूडची काही पार्श्वभूमी नाही. त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे स्टार किड आहेत जे परदेशातील अॅक्टिंग शाळेतून शिकून मग बॉलिवूडमध्ये ऑडिशन देतात. इथे दिग्दर्शक व कास्टिंग डिरेक्टरमुळे गोष्टी बदलतात.'


नेपोटिझम व्यतिरिक्त राधिकाने बॉलिवूडमधील मानधनावर प्रतिक्रिया दिली. तिने उदाहरण देताना सांगितले की,' जर सलमान खान बॉक्स ऑफिसवर २०० कोटी कमवतो आणि मी कोटी कमावत नाही. कारण सलमान खानची बॉक्स ऑफिसवर जास्त व्हॅल्यू आहे.'

ती पुढे म्हणाली की,' जर सिनेमात आईची भूमिका मुख्य आहे आणि तिला वडीलांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या तुलनेत कमी पैसे दिले जात असतील. तर ते चुकीचे आहे. यामध्ये बदल झाला पाहिजे.'


राधिकाच्या प्रोफेशन लाईफबद्दल सांगायचे तर राधिका आपटे शेवटची ब्रिटीश अमेरिकन अॅक्शन थ्रिलर 'द वेडिंग गेस्ट'मध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत जिम सरभ व देव पटेल मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Radhika Apte says, I have no problem with nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.