बाबो..! राधिका आपटेनं सेटवर झालेल्या दुखापतीचा व्हिडीओ केला शेअर, चाहते पडले चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 10:58 AM2022-04-28T10:58:05+5:302022-04-28T10:58:29+5:30

Radhika Apte: राधिका आपटेने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो व्हायरल होताना दिसत आहे.

Radhika Apte shared a video of the injury on the set, fans were worried | बाबो..! राधिका आपटेनं सेटवर झालेल्या दुखापतीचा व्हिडीओ केला शेअर, चाहते पडले चिंतेत

बाबो..! राधिका आपटेनं सेटवर झालेल्या दुखापतीचा व्हिडीओ केला शेअर, चाहते पडले चिंतेत

googlenewsNext

मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आपले स्थान निर्माण केले. बऱ्याच चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केल्या. याशिवाय ती बेधडक वक्तव्यासाठीही प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या पोटावर जखम झालेली दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसतो आहे. हा शर्ट पोटाकडे फाटलेला असून तिने जखम झालेली दिसत आहे. ती जखम दाखवताना राधिका दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. पण खरेतर ही खरी जखम नाही. तिने शूटिंगसाठी प्रोस्थेटिक मेकअप केला होता. जो मुंबईतील उकाड्यामुळे वितळत आहे. असे राधिका या व्हिडीओतून सांगते आहे.


राधिका आपटे बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.  हिंदी, मराठी शिवाय साउथच्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारणाऱ्या राधिकाने अल्पावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. मात्र अनेक कॉन्ट्रोव्हसीर्मुळेही ती चर्चेत राहिली आहे. न्यूड सीन्स लीक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीकादेखील झाली होती. 

Web Title: Radhika Apte shared a video of the injury on the set, fans were worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.