Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 04:28 PM2024-06-27T16:28:43+5:302024-06-27T16:32:14+5:30

राहा कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Raha Kapoor latest video viral she was seen at Mahesh Bhat s house wearing blue frock | Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात

Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची(Alia Bhat) लाडकी लेक राहा कपूर जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा तिच्यावरुनच नजरच हटत नाही. गोरी पान, घारे डोळे, कुरळे केस आणि चेहऱ्यावर कायम त्रासलेले हावभाव असले तरी ती सुपरक्युट दिसते. गेल्या वर्षी ख्रिसमसला रणबीर-आलियाने पहिल्यांदा लेकीला कॅमेऱ्यासमोर आणले. यानंतर चाहते तिच्या प्रेमातच पडले. इवलीशी राहा आतापासूनच सर्वांची लाडकी बनली आहे.

राहा कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी ती तिच्या आईवडिलांसोबत नाही तर केअरटेकरसोबत दिसत आहे. आजोबा महेश भट यांना भेटायला ती त्यांच्या घरी आली आहे. निळ्या-पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल फ्रॉकमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तसंच आजकाल तिची हेअरस्टाईलही एकदम वेगळी असते. डबल ट्रबल हेअरस्टाईलमध्ये ती दिसत आहे. कारमधून उतरताच राहाला एक मांजर दिसते आणि ती मांजरीकडे पाहत राहते. राहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कालच राहा आईवडिल आणि आजीसोबत नवीन घराचं काम पाहण्यासाठी गेली होती. तिथेही तिच्या क्युटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राहा कपूर आणि भट कुटुंबात सर्वांचीच लाडकी आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया एका मुलाखतीत म्हणाली की आता तिचं सगळं रुटीन बदललं आहे. राहाच त्यांना सकाळी झोपेतून उठवते. आम्ही आधी तिला मिठीत घेतो असं ती म्हणाली.

आलियाचा लवकरच 'जिगरा' सिनेमा येणार आहे. तिनेच सिनेमाची निर्मितीही केली आहे. शिवाय रणबीरसोबत तिचे 'ब्रह्मास्त्र 2','लव्ह अँड वॉर' रिलीज होणार आहेत.

Web Title: Raha Kapoor latest video viral she was seen at Mahesh Bhat s house wearing blue frock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.