बाबो..! कपूर घराण्याच्या पाकिस्तानातील ऐतिहासिक हवेलीत भूतांचा वावर?, 'कपूर हवेली' जमीनदोस्त होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 03:21 PM2020-07-13T15:21:19+5:302020-07-13T15:21:46+5:30

ऋषी कपूर यांचे आजोबा आणि ज्येष्ठे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म या हवेलीत झाला होता. कपूर हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर यांनी फाळणीच्या आधी १९२० च्या दरम्यान बांधली होती. सध्या या हवेलीत आता भुतांचे वास्तव्य असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Raj Kapoor's Haveli In Peshawar Turns Into A Ghost Building & Can Extinct Anytime; Residents Of The Area In Fear | बाबो..! कपूर घराण्याच्या पाकिस्तानातील ऐतिहासिक हवेलीत भूतांचा वावर?, 'कपूर हवेली' जमीनदोस्त होण्याची शक्यता

बाबो..! कपूर घराण्याच्या पाकिस्तानातील ऐतिहासिक हवेलीत भूतांचा वावर?, 'कपूर हवेली' जमीनदोस्त होण्याची शक्यता

googlenewsNext

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्याची पाकिस्तानमधील पेशावर शहारातील ऐतिहासिक वडिलोपार्जित 'कपूर हवेली' जमीनदोस्त करण्याची तयारी सुरू झाली आहे. हवेलीच्या सध्याच्या मालकाने या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा घाट घातला आहे. २०१८ साली ऋषी कपूर यांनी पाकिस्तानी सरकारला 'कपूर हवेली' वस्तुसंग्रहालयात रुपांतरीत करावी अशी विनंती केली होती. सरकारकडून यासंबंधी निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु हवेलीच्या मालकाशी करार होऊ शकला नाही.

'कपूर हवेली'चा मालकी हक्क सध्या जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार यांच्याकडे आहे. खैबर-पख्तुन्वा प्रांतातील पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार परिसरातील 'कपूर हवेली' जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे की, हवेलीत भुतांचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे हवेली मोडकळीस आली आहे आणि ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. हवेलीचे सध्याचे मालक हाजी मुहम्मद इसरार सध्या सरकारला हवेली देण्यास नकार दिला आहे.


'कपूर हवेली' पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती. हवेलीचे ऐतिहासीक महत्त्व लक्षात घेत सरकारला ही हवेली पर्यटनासाठी जतन करून ठेवायची आहे. परंतु इसरार याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याच्या विचारात आहे. या हवेलीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


ऋषी कपूर यांचे आजोबा आणि ज्येष्ठे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म या हवेलीत झाला होता. कपूर हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर यांनी फाळणीच्या आधी १९२० च्या दरम्यान बांधली होती.

सध्या या हवेलीत आता भुतांचे वास्तव्य असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ही हवेली कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. पहिला ही हवेली पाच मजल्याची होती पण आता तीन मजल्याची झाली आहे.

Web Title: Raj Kapoor's Haveli In Peshawar Turns Into A Ghost Building & Can Extinct Anytime; Residents Of The Area In Fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.