मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती 'या' प्रसिद्ध गाण्याला चाल; अख्ख्या देशाला लावलं होतं वेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:42 PM2024-06-30T12:42:10+5:302024-06-30T12:42:53+5:30

राज ठाकरेंनी एका गाण्याला चाल दिली होती. त्यांनी चाल दिलेल्या गाण्याने अख्ख्या देशाला वेड लावलं होतं.

Raj Thackeray connection with famous song Cham Cham karta hai nashila badan see details. | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती 'या' प्रसिद्ध गाण्याला चाल; अख्ख्या देशाला लावलं होतं वेड!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती 'या' प्रसिद्ध गाण्याला चाल; अख्ख्या देशाला लावलं होतं वेड!

MNS Chief Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम राजकारणी आणि उत्तम व्यंगचित्रकार आहेत. तसंच राज ठाकरेंचं चित्रपट प्रेमही सर्वश्रुत आहे. पण, तुम्हाला माहितेय राज ठाकरेंनी एका गाण्याला चाल दिली होती. त्यांनी चाल दिलेल्या गाण्याने अख्ख्या देशाला वेड लावलं होतं. या गाण्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं आपल्या डान्सने सर्वांची मन जिंकली होती. 

राज ठाकरे हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांना एका चित्रपटाच्या गाण्याचा किस्सा सांगितला.  'छमछम करता है नशिला बदन' या गाण्याची चाल ही राज ठाकरे यांनी दिलेली होती. राज ठाकरे यांनी या गाण्याची चाल गुणगुणली आणि त्यावर त्यांच्या मित्राने गाणं लिहिलं. याबाबत राज ठाकरे म्हणाले, 'या गाण्याची चाल माझी असली तरी गाण्याचे शब्द माझे नव्हते'. त्यांचं हे वाक्य ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला. 

अमेरिकेतील सान होजे इथं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात आलं. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.  या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित आले आहेत. सत्तरच्या दशकात अमेरिकेत येऊन पुढे स्वकर्तृत्वाने सिलिकॉन व्हॅलीवर अधिराज्य गाजवलेल्या प्रकाश भालेराव यांच्यासारख्या ख्यातनाम ज्येष्ठ उद्योजकांपासून पंचविशीतल्या तरूण अभियंत्यांपर्यंत सर्व पिढ्यांमधली मराठी माणसे गेली २ वर्ष या आयोजनासाठी झटत आहेत.  
 

Web Title: Raj Thackeray connection with famous song Cham Cham karta hai nashila badan see details.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.