रजनीकांत आणि तमन्ना भाटियाचा 'जेलर' 'PS2'चा करणार रेकॉर्ड ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 04:45 PM2023-08-11T16:45:07+5:302023-08-11T16:45:34+5:30

Jailer : रजनीकांत यांचा जेलर चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Rajinikanth and Tamannaah Bhatia's 'Jailer' will break PS2's record? | रजनीकांत आणि तमन्ना भाटियाचा 'जेलर' 'PS2'चा करणार रेकॉर्ड ब्रेक?

रजनीकांत आणि तमन्ना भाटियाचा 'जेलर' 'PS2'चा करणार रेकॉर्ड ब्रेक?

googlenewsNext

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या कामात खूप व्यग्र आहे. जी करदा आणि लस्ट स्टोरीज २नंतर आता ती अभिनेते रजनीकांत यांच्या सोबत जेलरमध्ये दिसणार आहे. जेलर बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून देत १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटात मोहनलाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार आणि रम्या कृष्णन यांसारखे प्रसिद्ध कलाकार देखील आहेत.

जेलरने एका दिवसातच प्रदर्शनानंतर ४९ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. हा आकडा तामिळनाडूमधून अंदाजे रुपये २५ कोटी, कर्नाटकमधून ११ कोटी रुपये आणि आंध्र प्रदेश-तेलंगणा प्रदेशातून अपेक्षित ७ कोटी असल्याचे समजते आहे. रिलीज होण्यापूर्वी, जेलरने आधीच देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते, बुक माय शोने ९ लाख तिकिटांची प्रभावी विक्री नोंदवली होती. विशेष म्हणजे, दक्षिणेकडील राज्यांनी सर्वाधिक मागणी आहे, ज्यामुळे ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

समीक्षक आणि प्रेक्षकांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया खूप सकारात्मक होत्या. जेलर २०२३ मधील सर्वात मोठ्या तमिळमधील सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. आत्तापर्यंत, हा सन्मान मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन २ यांच्याकडे आहे. थलपथी विजयच्या वारिसूला हा बहुमान मिळाला आहे. या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शनसह ३२ कोटी झाले. 
रुपेरी पडद्यावर जेलर उलगडत असताना रजनीकांत आणि तमन्ना भाटिया बॉक्स ऑफिसचा इतिहास पुन्हा लिहिण्यास तयार आहेत. कावला या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आणि सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंड सुद्धा झाले.

Web Title: Rajinikanth and Tamannaah Bhatia's 'Jailer' will break PS2's record?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.