रजनीकांतच्या 'जेलर' मध्ये झळकलेत दोन मराठी कलाकार, एकाची तर थलायवासोबतच एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:59 PM2023-08-11T14:59:15+5:302023-08-11T15:32:03+5:30
थलायवाच्या सिनेमात मराठी कलाकारांची महत्वाची भूमिका
साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) सिनेमा काल रिलीज झाला. सिनेमा रिलीज होताच चाहत्यांनी थिएटरबाहेर धुमाकूळ घातला. रजनीच्या चाहत्यांसाठी तर तो देवच आहे. साऊथमध्ये अनेक ठिकाणी रजनीकांतला पूजतात. दोन वर्षांपासून रजनीचे चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत होते. अपेक्षेप्रमाणे सिनेमाने प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचून आणली. सिनेमातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दोन मराठी कलाकारांनी भूमिका साकारली आहे.
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. जेलरच्या रिलीज दिवशी बंगळुरुत शाळा, कॉलेज, कार्यालयाने सुट्टी देखील जाहीर केली. जेलरची क्रेझ चांगलीच वाढत आहे. तर मराठी प्रेक्षकांसाठीही 'जेलर'खास असणार आहे. कारण मराठीतील दोन कलाकारांनी देखील सिनेमात काम केलं आहे. ते म्हणजे अभिनेता मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) आणि गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni).
गिरीश कुलकर्णीने सिनेमात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. इतकंच नाही तर त्याची एंट्री सुद्धा थलायवासोबतच आहे. जेलमध्ये दोघांचा सीन तर प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय. तर दुसरीकडे मकरंद देशपांडे सिनेमात गुंड आहेत. जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो. तर नंतर तेच रजनीची मदत करताना दिसतात.
दोघंही मराठी कलाकारांनी सिनेमा महत्वाची भूमिका निभावली असून संधीचं सोनंही केलं आहे.'जेलर' ब्लॅक कॉमेडी अॅक्शन फिल्म आहे. ट्रेड अॅनालिस्टनुसार, भारतात पहिल्या चारच दिवसात सिनेमा १०० कोटी गाठू शकेल.आता सिनेमा खरंच किती यश मिळवतो हे काहीच दिवसात स्पष्ट होईल. जेलरमध्ये रजनीकांतसोबतच राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबू, जॅकी श्रॉफ, मोहनलाल, विनायकन यांच्याही भूमिका आहेत.