"तीन तिघाडा, काम बिघाडा" अशी गत होऊ शकते 'या' ३ सिनेमांची

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:42 PM2024-08-20T15:42:10+5:302024-08-20T15:45:42+5:30

रजनीकांत, आलिया भट आणि सूर्या यांच्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

Rajinikanth Vettaiyan Suriya Kanguva and Alia Bhatt Jigra to Face Box Office Clash on October | "तीन तिघाडा, काम बिघाडा" अशी गत होऊ शकते 'या' ३ सिनेमांची

"तीन तिघाडा, काम बिघाडा" अशी गत होऊ शकते 'या' ३ सिनेमांची

Rajinikanth-Suriya-Alia Bhatt : सध्या एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.  यात सुपरस्टार्सचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांचा सामना करताना दिसून येत आहेत.  १५ ऑगस्टनंतर चित्रपटांसाठी दसऱ्याचा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातोय.  ऑक्टोबरमध्ये पुन्हा तीन मोठे चित्रपट आमनेसामने उभे ठाकणार आहेत. यात सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth), आलिया भट (Alia Bhatt) आणि सूर्या (Suriya) यांचे चित्रपट आहेत.

रजनीकांत, आलिया भट आणि सूर्या यांच्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर (Box Office Clash ) टक्कर होणार आहे.  १० ऑक्टोबरला रजनीकांत यांचा 'वेट्टैयन' (Vettaiyan),  सूर्याचा 'कंगुवा' (Kanguva) सिनेमा आणि ११ ऑक्टोबरला आलियाचा 'जिगरा' (Jigra) प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तिहेरी सामना रंगणार आहे. 'वेट्टैयन' या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यात अमिताभ बच्चन छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही तब्बल ३२ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.

दिग्दर्शक सिवा यांच्या 'कंगुवा' या चित्रपटाद्वारे बॉबी देओल तमिळमध्ये पदार्पण करत आहे. यात दिशा पाटनीही आहे. तर वामन बाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'जिगरा' या हिंदी चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना झळकणार आहेत. या सिनेमात आलिया पत्रकाराच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.  एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित झाल्यास प्रेक्षकवर्ग विभागला जातो. "तीन तिघाडा, काम बिघाडा" अशी गत येत्या ३ सिनेमांची होऊ शकते.


Web Title: Rajinikanth Vettaiyan Suriya Kanguva and Alia Bhatt Jigra to Face Box Office Clash on October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.