शाॉकिंग...! ‘कोरोना’ दानाच्या रकमेवरून रजनीकांत व विजयच्या चाहत्यात झाला राडा, एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:02 PM2020-04-24T15:02:54+5:302020-04-24T15:06:20+5:30

ही घटना तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यात घडली.

rajinikanth vs vijay who gave more money to corona relief fund argument lead to murder-ram | शाॉकिंग...! ‘कोरोना’ दानाच्या रकमेवरून रजनीकांत व विजयच्या चाहत्यात झाला राडा, एकाची हत्या

शाॉकिंग...! ‘कोरोना’ दानाच्या रकमेवरून रजनीकांत व विजयच्या चाहत्यात झाला राडा, एकाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देदोन चाहत्यांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने तूर्तास सगळीकडे खळबळ माजली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असताना या लढ्यात अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आलेत. साऊथच्याही अनेक कलाकारांनी मदतीचे हात दिलेत. साऊथ सुपरस्टार रजनीकांत, प्रभास, अजित, विजय असे या व अनेकांनी जमेल त्या पद्धतीने दान दिले. पण आता कुणी किती दान दिले, कुणी सर्वाधिक दान दिले यावरून चाहत्यांमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. केवळ इतकेच नाही तर याच वादातून एका सुपरस्टारच्या चाहत्याने दुस-या सुपरस्टारच्या चाहत्याची हत्या केल्याची खळबळजनक घटनाही समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यात घडली. वृत्तानुसार, सुपरस्टार रजनीकांत व सुपरस्टार विजय या दोघांच्या चाहत्यांमध्ये या वाद झाला आणि या वादातून एकाला जीव गमवावा लागला.

22 वर्षांचा युवराज हा अभिनेता विजयचा चाहता होता. तर 22 वर्षांचाच दिनेश बाबू रजनीकांतचा चाहता. गुरुवारी युवराज व दिनेश बाबू दोघेही भेटले. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असतानाही यांना कुठूनतरी दारू मिळाली. दारूच्या नशेत दोघांमध्येही वाद सुरु झाला. रजनीकांत यांनी अधिक रक्कम दान केली की विजयने यावरून हा वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दिनेशबाबूने युवराजला जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे युवराजच्या डोक्याला जबर मार लागला व तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दिनेशबाबूला अटक केली.
दोन चाहत्यांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने तूर्तास सगळीकडे खळबळ माजली आहे.

 
 

Web Title: rajinikanth vs vijay who gave more money to corona relief fund argument lead to murder-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.