रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:21 PM2023-10-04T13:21:21+5:302023-10-04T13:22:11+5:30

दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी तर कोणी सोडूच शकत नाही.

Rajkanikanth s next movie thalaivar 170 welcomes amitabh bachchan on board two will share screen after 32 years | रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार

रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार

googlenewsNext

हिंदी सिनेमाचे दोन दिग्गज अभिनेते एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) तर दुसरे थलायवा रजनीकांत (Rajnikanth). हे असे अभिनेते आहेत ज्यांचा सागराएवढा चाहतावर्ग आहे. दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी तर कोणी सोडूच शकत नाही. तर चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तब्बल ३२ वर्षांनी दोन्ही कलाकार सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 

रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' (Thalaivar 170)सिनेमात आता अमिताभ बच्चन यांचीही एन्ट्री झाली आहे. मेकर्सने सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'थलायवर 170' मध्ये अमिताभ यांच्या एन्ट्रीमुळे सिनेमा वेगळ्याच उंचीवर पोहोचला असल्याची पोस्ट मेकर्सकडून करण्यात आली आहे. वाईएलसीए प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केली आहे. सोबतच एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि सिनेमाचं टायटल दिलेलं आहे.

९० च्या दशकात बिग बी आणि रजनीकांत यांची जोडी एकत्र दिसली होती. 1983 मध्ये 'अंधा कानून' आणि 1985 मध्ये 'गिरफ्तार' या चित्रपटात दोघांची भूमिका होती. तर 1991 साली रिलीज झालेल्या 'हम' या सिनेमात त्यांनी शेवटची स्क्रीन शेअर केली होती. आता तब्बल ३२ वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पाहता येणार आहे. 

आजपासून सिनेमाच्या शूटला सुरुवात होत आहे. अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच तमिळ सिनेमा असणार आहे. यामध्ये राणा दगुबत्तीचीही मुख्य भूमिका आहे.

Web Title: Rajkanikanth s next movie thalaivar 170 welcomes amitabh bachchan on board two will share screen after 32 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.